मराठा आरक्षणाची सुनावणी मिश्र पद्धतीने

SC rejects Maratha reservation

नवी दिल्ली :- शिक्षण आणि नोकरीतील मराठा आरक्षणावरील सुनावणी संमिश्र पद्धतीने होईल. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी ८ मार्चपासून ऑनलाईन आणि मिश्र पद्धतीने घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शुक्रवारी स्पष्ट केले.

गेल्या मार्चपासून या प्रकरणाची सुनावणी फक्त ऑनलाईन पद्धतीने होत आहे. ‘न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाल्यास या खटल्यात समक्ष युक्तिवाद करता येईल. त्याचबरोबर पक्षकारांना ऑनलाईन युक्तिवाद करण्याचीही मुभा दिली जाणार.’ असे न्यायमूर्ती अशोक भूषण (Ashok Bhushan) यांनी सांगितले.

मार्चमधील सुनावणीचे वेळापत्रकही घटनापीठाने या वेळी जाहीर केले. सर्व पक्षकारांच्या वकिलांना आपापले युक्तिवाद ‘सॉफ्ट कॉपी’ आणि लेखी स्वरूपात न्यायालयात दाखल करावे लागणार आहेत. या खटल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सुनावणी समक्ष पद्धतीनेच घ्यावी, असे मत सरकारने न्यायालयात मांडले होते. या खटल्यात न्यायालयाने अटर्नी जनरलचीही मदत मागितली होती. गेल्या वर्षी ९ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रकरणातील याचिकांच्या एकत्रित सुनावणीदरम्यान कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली; परंतु खटल्याचा निकाल तातडीने लागावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली होती.

ही बातमी पण वाचा : Farmers Protest : शेतकऱ्यांचा राज्यात चक्का जाम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER