कोल्हापूर : राजाराम कारखान्याच्या अपात्र सदस्यांची उद्या सुनावणी

राजाराम साखर कारखाना

कोल्हापूर :- कसबा बावडा राजाराम साखर कारखान्याच्या अपात्र १८९९ सभासदांची सुनावणी साखर सहसंचालक कार्यालयात सुरु आहे. परंतु आजही सुनावणी होवू शकली नसल्याने आता ही सुनावणी उद्या, मंगळवारी दुपारी चार वाजता होणार आहे.

राजाराम साखर कारखान्याचे १८९९ इतके सभासद हे कारखाना कार्यक्षेत्राबाहेरचे असल्याने त्याचं सभासदांच सभासदत्व रद्द करण्याची याचीका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती. ज्या सभासदांना अपात्रतेच्या नोटिसा बजावल्या आहेत, अशा सभासदांनी शेतीचा सात बारा, आधार कार्ड आणि राजाराम कारखान्याला ऊस पुरवठा केलेल्या कराराच्या स्लीप असे पुरावे सादर केले आहेत. अपात्र सभासदांच्या छाननीही झाली आहे. तक्रारदारांच्यावतीने अ‍ॅड. संजय डिग्रज, अ‍ॅड. केदार लाड, अ‍ॅड. योगेश तेली, अ‍ॅड. पंडित अतिग्रे आणि राजाराम कारखान्याचे वकील लुईस शहा यांचा प्रादेशिक साखर सह संचालक अरुण काकडे यांच्यासमोर युक्तीवाद सुरु आहे. २४ तारखेला अपूर्ण राहिलेली सुनावणी आज, २७ जानेवारीला होणार होती. मात्र कोल्हापूर बार असोसिएशनचे ज्येष्ठ वकील दिलीप पाटील यांचं निधन झाल्यानं ही सुनावणी आता उद्या, मंगळवारी दुपारी चार वाजता होणार असल्याचं प्रादेशिक सखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले. न्यायालयाने सदरची सुनावणी १५ फेब्रुवारीपर्यंत संपण्याचा निर्देश साखर सहसंचालक यांना दिले आहेत.