सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार, राजेश टोपेंची माहिती

Rajesh Tope

मुंबई :- केंद्र सरकारच्या आदेशानुसार देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला (Corona Vaccination) सुरवात होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही लसीकरण्याच्या पार्श्वभूमीवर लसी पोहोचल्या आहेत. लसीकरणासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचं सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आनंद व्यक्त केला. राज्यात कोरोनाचं लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आता सीरम इंन्स्टिट्यूटकडून राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये लसीचे डोस पोहोचवले जात आहेत. कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील मोहिमेत कोणाला सर्वात आधी लस मिळणार ती कोणाला देऊ नये आणि कसं असेल नियोजन याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्राच्या सुचनेनंतर लसीकरण केंद्राची संख्याही 511 वरुन 350 पर्यंत कमी करण्यात आली आहे. आता ही लस 512 ऐवजी 350 सेंटरवर पाठवली जाणार आहे. राज्यातील फ्रंटलाइनवर म्हणजेच कोव्हिड योद्धे असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी ही लस दिली जाणार आहे. या लसीचा प्रत्येकाला एक डोस देण्याऐवजी सुरुवातीलाच आरोग्य कर्मचाऱ्यांना या लसीचे 2 डोस पूर्ण केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्य कर्मचाऱ्यांना दोन डोसमध्ये चार आठवडे ते सहा आठवड्यांचं अंतर असणार आहे. पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आले असल्याचा आरोप करत आतापर्यंत राज्यात 9.63 लाख म्हणजे 55 टक्के डोस उपलब्ध झाले आहेत. सर्वात आधी कोव्हिड योद्धांना ही लस मिळणार आहे. दर दिवशी साधारण 20 हजार जणांना ही लस दिली जणार आहे.

18 वर्षांपेक्षा लहान आणि ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे अशा लोकांना ही लस मिळणार नाही. मात्र अत्यावस्थ रुग्णांना ही लस द्यावी का याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकारची चर्चा सुरू आहे. तसंच ज्या गर्भवती महिला, तसंच ज्या महिला स्तनपान करत आहेत किंवा ज्या लोकांना काही ॲलर्जी आहेत त्या लोकांना लस देण्यात येणार नाही अशी देखील माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. प्राधान्यक्रमाप्रमाणे लसीकरण मोहीम राज्यात राबवली जाणार असून सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती देखील यावेळी केली आहे.

ही बातमी पण वाचा : जगभरातून ‘मेड इन इंडिया ‘ लसींला ‘डिमांड’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER