आरोग्य सेविकांचा ‘आम्ही नवदुर्गा’ : फोटो सोशल मीडियावर चर्चा

आरोग्य सेविकांचा 'आम्ही नवदुर्गा'

कोल्हापूर : अविरत आरोग्य सेवा देणाऱ्या कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील चंदगड येथील कोविड काळजी केंद्रावर (Covid Care Center) डॉक्टर आणि नर्सेस यांच्या भन्नाट कल्पनेतून आरोग्य सेवकांनी ‘आम्ही नवदुर्गा’ हा हालता जिवंत देखावा सादर करून कोविड रूग्णांना एक वेगळीच ऊर्जा दिली. आजपासून दसरा सणाला प्रारंभ होत आहे. सलग नऊ दिवस दांडिया, गरबा नृत्यांची धामधूम असते.

मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवकांना मात्र यापासून वंचित राहावे लागते. ‘आम्ही देश सेवेत आम्ही मागे हटणार नाही’, आम्ही समाजाच्या आरोग्याची काळजी घेऊ, आणि देश बलवान, ताकदवान बनवू अशी यावेळी या ‘दुर्गा नी शपथ घेऊन कोरोना हद्दपार करणारच, सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, शांती, समाधान लाभो अशी दुर्गेकडे प्रार्थना केली. यावेळी आरोग्य सेविकांनी आरोग्य ‘दुर्गावतार’ सादर केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER