
मुंबई :- सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये दुसऱ्याने लस (Corona vaccination) घेतली की मी घेतो, अशी मानसिकता दिसून येत आहे. मात्र, त्यांनी स्वत:हून पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यांच्या या कृतीमुळे लस सुरक्षित असल्याचा संदेश समाजापर्यंत पोहचेल, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी व्यक्त केले आहे.
तसेच, कोरोना लसीबाबत साशंकता असल्याने माध्यमांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना ‘आपण कधी लस घेणार?’ असे विचारल्यानंतर, ‘टोपे यांनी माझी वेळ आल्यावर मी लस घेईन’ असे स्पष्ट केले. केंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत: त्यासाठी पुढाकार घेईन. पण सध्याच्या नियमांनुसार आमचा टर्न नंतर आहे. केंद्र सरकारने लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम प्राधान्य देण्याचे ठरवल्याचे टोपे यांनी सांगितले.
कोरोनाच्या लसीमुळे कोणते साईड इफेक्टस होऊ शकतात?
कोरोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र, लस घेतल्यानंतर काही जणांना किरकोळ त्रास जाणवू शकतो. यामध्ये लस दिलेल्या भागात सूज येणे, अंगावर लाल पुरळ उठणे किंवा अस्वस्थ वाटणे अशा लक्षणांचा समावेश आहे. तर काही जणांना ताप येणे किंवा चक्कर येण्यासारखी सामान्य लक्षणे जाणवू शकतात. शरीराला खाज येणे किंवा घाम सुटणे ही लक्षणे सामान्य नसली तरी त्यामुळे जीवघेणा धोका उद्भवणार नाही, अशी हमी राजेश टोपे यांनी यापूर्वीच दिली होती.
ही बातमी पण वाचा : लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य द्या, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला