राज्यात ‘स्वास्थ्य महाराष्ट्र’ मोहीम राबविण्यात येणार  : राजेश टोपे

Rajesh Tope

मुंबई   :  राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्वाचे पाऊल उचलले आहे . येत्या १५ सप्टेंबरपासून ‘स्वास्थ्य महाराष्ट्र’ (Healthy Maharashtra) मोहीम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबवण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची माहिती घेऊन सारी, इतर व्याधी आणि ६० वर्षांपुढील नागरिकांचा विदासंच (डाटा) तयार केला जाणार आहे, अशी माहिती  टोपे यांनी  दिली.

महात्मा फु ले जनआरोग्य योजनेंतर्गत करोना रुग्णांवर उपचार करताना शासकीय दरांपेक्षा जादा रक्कम आकारल्यास संबंधित रुग्णालयांना पाचपट दंड आकारण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. वेळप्रसंगी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा किंवा रुग्णालयाला महात्मा फुले योजनेतून वगळण्याचेही अधिकार दिले आहेत. तसेच दीड लाखकिंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या प्रत्येक देयकांचे पूर्वलेखापरीक्षण झालेच पाहिजे, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत, असेही टोपे यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांवर कायम-राजेश टोपे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER