“आरोग्यम् धनसंपदा !” (लेख ३ रा!)

Yoga

हाय फ्रेंड्स ! कालच्या लेखाच्या अखेरीला आपण ठरवलं होतं की “स्वभावाला औषध नाही !”किंवा “कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच !” असे कोणी आपल्याबद्दल म्हणत असेल तर ते चॅलेंज स्वीकारा ! कसं ? हो ! अलिबाबाच्या गुहेची एक किल्ली आपल्याला मिळालेली आहे. ती म्हणजे “विवेकनिष्ठ विचार प्रणाली ! “( REBT)

आपल्याला कळून चुकलेय आजपर्यंत. काही गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये असतात , तर काही गोष्टींवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. समोरच्या व्यक्तीने कसं वागावं? ती कुठे चुकते आहे ?किंवा समोरच्या कडून आपल्या काही अपेक्षा असतील, तर त्या पूर्ण कदाचित होणार नाही .आणि बरेचदा चर्चा करूनही ही परिस्थिती फार बदलत नाही, असं लक्षात येतं .मग पदरी पडते ती निराशा !

हीच वेळ आहे मनात ठरवायची की “मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार होणार !”

माझ्या भावनांवर तरी माझे नियंत्रण आहे का? नाही ना? मग मी प्रयत्न करेन माझे माझ्यावर नियंत्रण आणण्यासाठी ! मात्र या बाबत एक पथ्य जे खूप महत्वाचं आहे ते नेहमी पाळावं लागतं . कुठली गोष्ट माझ्या नियंत्रणातील आहे आणि कुठली गोष्ट माझ्या नियंत्रणाबाहेरची आहे! याचा नीट विचार सतत मनात चालू ठेवायचा आहे. कालपर्यंत सगळ्या नकारात्मक भावना चिंता,निराशा,मत्सर यांचे जन्मस्थान समोरची व्यक्ती ठरवून मी कसा बिचारा किंवा बीचारी असं स्वतःला गोंजारणे चालू असायचं.” त्याने किंवा तिने मला दुखावले”वगैरे. पण आपण काय दूधखुळे आहोत का? स्वतःला बुद्धी नाही का? स्वतःच्या भावनांवर आपला कंट्रोल नाही का? की माझ्या भावनांचा रिमोट कंट्रोल मी दुसऱ्यांकडे देऊन दिला आहे?

थोर मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिस यांनी” विवेकनिष्ठ विचार प्रणाली “म्हणजेच REBT (रॅशनल इमोटिव बिहेविअरल थेरपी ) सांगितली. जी स्वयम् विकासासाठी खूप उपयुक्त आहे असे जगभरातील तज्ज्ञ सांगतात. कारण याला आत्मपरीक्षणाचे कोंदण आहे. ती यशस्वी करणे सर्वस्वी माझ्या हातात आहे .कारण बरेच लोक स्वयम् विकासाच्या वेगवेगळ्या पद्धतींवर मध्ये डोकावतात मात्र त्यांना फायदा कशाचाच होत नाही. कुठलीही पद्धती ,आपण जोपर्यंत त्याचा वापर करत नाही,

मेहनत घेत नाही तोपर्यंत फायदेशीर होत नसते.It never works by itself.Unless you make it work !

मानव उत्क्रांतीच्या काळात होता ,तोपर्यंत त्याची लढाई ही अस्तित्वासाठी होती, त्याच्या समोरची आव्हाने ही जीवशास्त्रीय होती. म्हणूनच तात्काळ निर्णय घेऊन फाईट, फ्लाईट, फ्रिज हे तीनच पर्याय त्याच्यासमोर होते. आज कुणाला टेन्शन नाही ? असं बघितल तर “असा या भूमंडळी तुच शोधूनी पाहे “असेच म्हणावे लागेल. पण आमची जी टेन्शन्स आहेत ती मनोसामाजिक आहेत. त्यात विचार करायला, निर्णय घ्यायला वेळ असतो. उदाहरणार्थ परीक्षेचे टेन्शन. परीक्षा केव्हा होणार? हे माहिती असतं .कशी होणार? हे माहीती असत. याची तयारी आपण करू शकतो.

1956 मध्ये अमेरिकन मानसशास्त्रीय परिषदेत एलिस यांनी बारा अविवेकी धारणांचा उल्लेख केला. पुढे तर यांची संख्या 50 वर गेली .मात्र सखोल विचाराअंती त्यांनी ते तीन विभागात विभागले.

१) माझं काम सर्वोत्तम झालंच पाहिजे !
२) इतरांनी मला नेहमी चांगलं वागवलं च पाहिजे !
३) जीवन माझ्यासाठी कष्टप्रद असूच नये !

प्रत्येक वाक्यातला “च” हा घात करतो. मग यावर उपाय काय? तर एलिस यांनी यासाठी ABCDE मॉडेल मांडले आहे. त्याचे विवेचन पुढील प्रमाणे :

A :- ( Activating इव्हेंट ) यात त्रासदायक विचार व घटना. वर्तमान काळातील /भूतकाळातील किंवा /भविष्यकाळातील, एखाद्या परिस्थितीबद्दल /व्यक्ती विषयीच्या /किंवा एखाद्या विचाराशी संबंधित.
B:-(beliefs) म्हणजे त्या घटनेकडे वा गोष्टीकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन.
C:-(consenquenses/परिणाम)माझ्या दृष्टिकोनानुसार आणि माझ्या स्वतःची असलेल्या संभाषणाला अनुरूप म्हणजे माझा स्वसंवाद जो असतो त्याप्रमाणे.
D:(Disputing irrational beliefs) माझे अविवेकी विचार शोधून त्यांना दिलेला विवेकी पर्याय!
E: (Effective new beliefs) आणि त्यानुसार माझ्या या आयुष्याला योग्य आणि मूल्यवान करणे किंवा विवेकी पर्यायामुळे होणारे चांगले परिणाम.

आता हे मॉडेल आपण एका उदाहरणाने बघूया.

A: एखादी नवीन व्यक्ती कंपनीत नव्यानेच लागलीय. आणि तिला तिच्या प्रेझेंटेशन करायचे आहे. मात्र तिला वाटलं त्याप्रमाणे ,तिच्या अपेक्षेप्रमाणे ते चांगलं झालेलं नाही. असं तिला वाटतंय.
B: अविवेकी विचार.” माझी असं काही करण्याची क्षमता किंवा योग्यताच नाही !”
C: परिणामतः दुःखी आणि निराश होणे. “आय ॲम होपलेस “ची भावना आणि त्याचा परिणाम म्हणून “यापुढे मी कधीही प्रेझेंटेशन करणारच नाही !” हे गाठलेले टोक!
D: मध्ये अविवेकी विचारांना परत रीफ्रेम करूया! कसे ?कोणकोणत्या प्रकारे ?
*-“-मला आता नाराज वाटतय खरी ,पण पुढे केव्हातरी मी नक्कीच माझ्या पूर्णप्रयत्नांनीशी यशस्वी प्रेझेंटेशन करेन!”
*– “यापासून मी काय शिकलो किंवा शिकले? की हार्ड वर्क ला पर्याय नाही!”
*– “हा ! प्रेझेंटेशन भलेही चांगलं झालं नसेल पण एवढ्या लोकांसमोर बोलायची मला सवय तर झाली !”
*– “त्या निमित्ताने सगळे मला ओळखायला तर लागले.”
E: परिणामतः विवेकी विचार .” मी अतिशय योग्य आणि परिणामकारक प्रेझेंटेशन चे उत्कृष्टरित्या रीत्या सादरीकरण करीन.”

अशा पद्धतीने आपल्यातील अविवेकी विचारांना विवेकनिष्ठ विचारात रूपांतर करता येते. यासाठी काही टूल्स देखील मानसशास्त्र सांगतं .जसे १) I am always a looser ! मी नेहमीच? अपयशी? असतो का? हा प्रश्न स्वतःला विचारा २) कुठल्याही वाईटत वाईट गोष्टीतून चांगली गोष्ट शोधा. त्यासाठी म्हणा” तरी बरं !” कोरोनाने वीट आणलाय खरा ! पंढरी बरं तुमच्या एक्झाम स्तर होऊन गेल्यात!

फ्रेंड्स! जागेची मर्यादा आहे खरी. पण “तरी बरं ! तुम्हाला निदान या संकल्पनेची ओळख तर झाली!”

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER