सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात आरोग्यविमा हीसुद्धा अत्यावश्यक सेवा

Delhi HC - Epass - Maharashtra Today
  • कंपनीच्या कर्मचाºयांना ई-पास देण्याचा आदेश

नवी दिल्ली : सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात विमा कंपन्यांच्या आरोग्यविमा व ‘मेडिक्लेम’सारख्या पॉलिसींचे काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे काम हेसुद्धा अत्यावश्यक सेवेतच गणले जायला हवे, असे नमूद करत अशा कर्मचार्‍यांना त्यांच्या कामासाठी शहरात मोकळेपणाने फिरता यावे यासाठी ‘ई-पास’ द्यावेत, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने तेथील सरकारला दिला.

मे.मॅॅक्स बूपा हेल्थ इन्शुरन्स कं. लि. या खासगी विमा कंपनीने केलेल्या याचिकेवर न्या. प्रतिभा एम,. सिंग यांनी हा आदेश दिला. दिल्ली प्रशासनाने त्यांच्या कर्मचाºयांना ’ई-पास’ देण्यास नकार दिल्याने कंपनीने याचिका केली होती.

दिल्लीमध्ये सध्या कोरोना महामारीमुळे लोकांच्या हिंडण्या-फिरण्यावर कडक निर्बंध लागू आहेत. त्यात ज्यांना कामानिमित्त घराबाहेर जाण्यास मुभा आहे अशा कर्मचाºयांची दिल्ली प्रशासनाने अनेक गटांमध्ये वर्गवारी केली आहे. त्यात एक गट सरकारी व निम सरकारी कर्मचाºयांचा आहे व त्यांना केवळ स्वत:चे नोकरीचे ओळखपत्र दाखवून फिरण्याची परवानगी आहे. दुसºया वर्गात खासगी कर्मचारी आहेत व त्यांना कामाच्या स्वरूपानुसार ‘ई-पास’ घेऊन फिरण्याची मुभा आहे.

मॅक्स बुपा कंपनीने ज्यांनी त्यांच्याकडून आरोग्य विमा आणि ‘मेडिक्लेम’ पॉलिसी घेतल्या आहेत व त्यांच्यापैकी ज्यांचे विमाधारक सदस्य सध्या कोरोनाचे उपचार घेत आहेत त्यांचे इस्पितळातील ‘कॅशलेस अ‍ॅडमिशन’चे काम करणे व विम्याच्या क्लेमची शहानिशा करून ते तत्परतेने ‘सेटल’ करणे यासाठी दिल्लीत ३६ कर्मचारी नेमले आहेत. या कर्मचाºयांच्या ‘ई-पास’साठी कंपनीने अर्ज केला. परंतु त्यांचे काम ‘अत्यावश्यक सेवेत’ मोडत नाही, असे सांगून प्रशासनाने ‘ई-पास’ देण्यास नकार दिला.

न्या. सिंग यांनी निकालात म्हटले की, कार्यालयांत बसून काम करणाºया बँका व विमा कंपन्यांच्या कर्मचाºयांचा प्रशासनाने ‘अत्यावश्यक सेवे’त समावेश केला आहे. तेव्हा सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात याचिकाकर्त्या कंपनीच्या या कर्मचाºयांचे काम हेही लोकांच्या दृष्टीने नक्कीच ‘अत्यावश्यक सेवा’ आहे. कंपनीने या कर्मचार्‍यांच्या तपशीलासह अर्ज करावा व प्रशासनाने त्यांना ’ई-पास’ द्यावेत, असा आदेश दिला गेला.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button