
कोल्हापूर : गेल्या चार दिवासांपासून निर्माण झालेले ढगाळ वातावरण, मध्येच कोसळणारा पाऊस अशा स्थितीशी जुळवून घेणे नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. ऋतुबदलाचा मानवी आरोग्यावर तत्काळ परिणाम होतो. त्यामुळे सध्या सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशा प्रकारच्या व्याधींनी नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, अशा बदलत्या वातावरणात आरोग्याची पुरेशी दक्षता घेण्याची गरज आहे.
कोरोना (Corona) संसर्गाला वातावरण पोषक वातावरणातील बदलामुळे विषाणूंचा संसर्ग वाढतो. अॅलर्जीच्या आजारांचे प्रमाण बळावते. कोरोना डेंग्यू, चिकुनगुनियाला हे वातावरण पोषक आहे. तसेच सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशा व्याधींचा त्रास नागरिकांना सुरू होतो. त्यामुळे आरोग्याची योग्य खबरदारी घेणे अपेक्षित आहे. परिपक्व आहार अशा वेळी महत्त्वाचा आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत, असे तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे.
या समस्येत डासांची देखील भर पडू शकते. त्यामुळे डासांची उत्पत्तीची ठिकाणे तत्काळ नष्ट करण्यासह आरोग्याच्या समस्यांना दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी पुरेशी काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. सर्दी, खोकला, घशाचे विविध विकार, ताप, डोकेदुखी, उलट्या, जुलाब यासारखे आजार झाल्यास तत्काळ डॉक्टरांच्या बळावण्यासह सल्ल्याने औषधे घेणे फायदेशीर ठरू शकते. अनेक नागरिक घरगुती उपाय करण्यावर भर देतात. मात्र, अशावेळी कुठलीही रिस्क घेणे चुकीचे ठरू शकते. आजारी असताना तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा. ढगाळ वातावरण, उष्मा, पाऊस, थंडी असे वातावरण आरोग्यास अपायकारक ठरू शकणारे आहे. अशा वातावरणात व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. वातावणातील बदलामुळे प्रामुख्याने सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, अस्थमा कोरोनासारख्या आजाराचे विषाणू पसरण्यासही हातभार लागू शकतो. संसर्गजन्य आजारांमुळे रुग्णसंख्याही वाढू शकते. या बदलाशी जुळवून घेण्यास शरीराला काही वेळ लागतो.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला