कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त आरोग्य शिबिर

kolhapur health camp

कोल्हापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा सोहळा साजरा करताना राज्य उत्पादन शुल्क, कल्याणकारी संस्था कोल्हापूर यांचेमार्फत विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांचे, मोफत आरोग्य तपासणी शिबीर, रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूर, केमिस्ट असोसिएशन कोल्हापूर आणि स्वस्तिक हॉस्पिटलच्या वैद्यकीय तज्ञांच्यामार्फत राबविण्यात आले..

सामान्यतः युनिफॉर्म सर्व्हिस करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यास सततच्या तणावपूर्ण कामामुळे वारंवार निर्माण होणाऱ्या शारीरिक व्याधींकडे लक्ष देता येत नाही.. कामातील सततची अनियमितता, अयोग्य आहार, मानसिक तणाव, आणि व्यायामाच्या अभावामुळे होणाऱ्या त्रासांवर तात्काळ उपाययोजनांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात सर्वांनी योगदान दिले याबद्दल सर्व सहभागी संस्थांच्या कामाचे कौतुक करण्यात आले.