
लहानपणापासून दाढीच्या डब्ब्यात ठेवलेली किंवा पाणी स्वच्छ करणारी तुरटी आपण बघितली असेलच. दाढी करतांना ब्लेडने रक्त निघाल्यास पटकन तुरटी (Alum)फिरविली की रक्त थांबते व जखम लवकर भरून आणते. गढूळ पाणी असेल तर तुरटी पाण्यात फिरविल्यास घाण, माती तळाला जाऊन बसते व स्वच्छ पाणी मिळते. पाणी शुद्ध करण्याची ही पद्धत पूर्वापार आहेच. आयुर्वेदात स्फटीका नावाने आलेली ही तुरटी अनेक रोगांवर औषधी बाह्य आभ्यांतर प्रयोगार्थ वापरली जाते. कच्ची किंवा भस्म स्वरूपात फिटकरी वा तुरटीचा उपयोग करण्यात येतो.
तुरटी स्वच्छ करून तव्यावर गरम केल्यास त्यातील द्रव्यांश उडून जातो व खडूप्रमाणे पांढरे भस्म तयार होते. हे भस्म आभ्यंतर व बाह्य प्रयोगार्थ वापरण्यात येते.
तुरटी रक्तवाहिन्यांना संकुचित करते त्यामुळे रक्तस्राव थांबविण्यास मदत होते. या तुरटी भस्माचा डस्टिंग पावडरप्रमाणे कुठल्याही व्रण जखम इजा झाल्यास उपयोग करता येतो. व्रणरोपण (जखम बरी) होण्याकरीता तुरटी भस्म व तूप एकत्र करून पट्टी बांधावी. रक्त लगेच थांबते व घाव पूयनिर्माण न होता लवकर भरतात.
नेत्ररोगाकरीता तुरटी उत्तम उपाय आहे. डोळ्यात मळ चिकट स्त्राव निघत असेल, धूळ गेल्याने त्रास होत असेल तर तुरटी फिरविलेल्या पाण्याने डोळे स्वच्छ करावे.
- हूपिंग कफ, लहान मुलांना होणाऱ्या खोकल्यावर इतर औषधी कल्पांसह तुरटीभस्माचा वापर करता येतो.
- मुखपाक असल्यास जिभेला फोड येत असल्यास तुरटीच्या पाण्याने गुळण्या करणे लाभदायक आहे.
- मंजनामधे तुरटी भस्माचा वापर करता येतो. हिरड्यातून रक्त येणे बंद होते.
- तुरटी स्वस्त व लवकर उपलब्ध होणारी असल्याने घर
- गुती औषधींमधील उत्तम पर्याय आहे.
ह्या बातम्या पण वाचा :
- सैंधव – आरोग्यास हितकर मीठ !
- त्रिफळा – अनेक व्याधींचे त्रिफळा उडविणारे एक औषध !
- कृमिविकार – त्यावर आयुर्वेद चिकित्सा
- मीठ : न अति उपयुञ्जीत !
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला