पवारांच्या हृदयावरची जखम भरून काढा, जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Sharad Pawar & Jitendra Awhad

नवी मुंबई : मीरा भाईंदरचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले त्याचवेळी, गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाणार असल्याचे मी ओळखले होते आणि शरद पवार (Sharad Pawar) यांना याबाबत कल्पना दिली होती परंतु, त्यांच्यावर पवारांचा प्रचंड विश्वास होता. नंतर काही काळातच नाईक यांनी राष्ट्रवादी सोडली. ही जखम पवार यांच्या हृदयावर आजही आहे. ही जखम भरून काढण्याचे काम महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले. ते १७ जानेवारी रोजी नवी मुंबई महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.

विकास कशाला म्हणतात हे मला माहीत नाही, परंतु दुसऱ्याने केलेली कामे आपल्या नावावर कशी खपवायची हे जर शिकायचे असेल तर नाईकांकडे जाऊन शिका, असा टोमणा त्यांनी मारला. प्रत्येक सभेला शरद पवार यांच्याशेजारी नाईक बसायचे, परंतु भाजपच्या पहिल्याच सभेत त्यांना खाली जागा मिळाली नाही. त्याचं वाईट वाटत असल्याचे सांगत त्यांच्यात स्वाभिमान उरलेला नसल्याची टीका त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER