कांदा निर्यात बंदीबाबत केंद्र सरकारला पत्र पाठविणार

CM Uddhav Thackeray

कांदा निर्यायतबंदीसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. यासंदर्भात केंद्राला तातडीने पत्र पाठविण्यात येईल तसेच पाठपुरावा करून निर्यातबंदी उठविण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात विचार मांडले. यावेळी प्रधान सचिव अनुप कुमार यांनी माहिती दिली की, २०१८-१९ मध्ये २१.८३ लक्ष मेट्रिक टन, २०१९-२० मध्ये १८.५० लक्ष मेट्रिक टन कांदा निर्यात (Onion Export) झाल्याचे सांगितले. मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, जेएनपीटीमध्ये सध्या चार लाख मेट्रिक टन कांदा पडून आहे. बांगलादेश, नेपाळ सीमेवर ५०० ट्रक्स थांबून आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER