ज्याचं आयुष्यच लुबाडणुकीत गेलं त्यानं शहाणपणा शिकवू नये; विनायक राऊतांचे प्रत्युत्तर

Narayan Rane - Vinayak Raut

सिंधुदुर्ग :- ज्याचं राजकीय आयुष्यच मेवा-मिठाई लुटण्यात गेलं त्या नारायण राणेंनी (Narayan Rane) अनिल परब (Anil Parab) किंवा महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) शहाणपणा शिकवू नये. त्यांनी टीका करण्याचं धाडस करू नये, असं म्हणत शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं. मुंबईचा  निलंबित पोलीस अधिकारी सचिन वझे याने लिहिलेल्या पत्रात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर नियुक्तीसाठी पैसे मागितल्याचा आरोप केला होता. त्यावरूनच नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप करत लक्ष्य केले. यानंतर राऊत यांनी राणेंना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले.

विनायक राऊत म्हणाले, ‘ज्याचं राजकीय आयुष्यच मेवा-मिठाई लुटण्यात गेलं त्या नारायण राणेंनी अनिल परब किंवा महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची हिंमत दाखवू नये. नारायण राणेंच्या विरुद्ध आमच्याकडे अनेक सबळ पुरावे आहेत. उद्योगमंत्री असताना नारायण राणेंनी अनेक जमिनींवर कब्जा केला. या जमिनी वन खात्याच्या किंवा एमआयडीसीच्या असतील. त्यांची अनेक प्रकरणं आजसुद्धा बाहेर येत आहेत. त्यामुळे ज्याचं आयुष्यच लुबाडणुकीत  गेलं त्यांनी अनिल परबना शहाणपणा शिकवण्याची गरज नाही.’

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत संयमाने आणि तेवढ्याच निर्धाराने महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम करत आहेत. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे शिस्तीचं आणि कोरोना नियंत्रित ठेवण्याचं पूर्णपणे पालन केलं जात आहे. मात्र, ज्यांना काविळ झालेली त्यांना सगळंच  पिवळं दिसतं. नारायण राणे हे सत्तेच्या खुर्चीसाठी झपाटलेले व्यक्ती आहेत. त्यांना सत्तेची खुर्ची मिळत नाही म्हणून वेड्यासारखे वागत आहेत. यासाठीच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अशा पद्धतीने टीका करत आहेत. त्यांना जे बरळायचं असेल ते बरळू दे, मात्र शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संयमाने आणि निर्धाराने कोरोना (Corona) नियंत्रणात ठेवण्याचं काम करत आहेत.’ असेही राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button