राहुल गांधींसोबत गेला तो, बुडाला; भाजपाची टीका

Rahul Gandhi & Keshav Upadhye

मुंबई :- बिहार विधानसभेच्या निवडणुकीत सध्या एनडीएने मुसंडी मारली आहे. महाआघाडीची घसरण होताना दिसते आहे. भाजपाने काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीका म्हटले, राहुल गांधींसोबत जो गेला तो बुडाला.

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या सुरूवातीच्या कलांमध्ये महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत होते. मतमोजणीच्या फेऱ्या वाढताना महाआघाडीची घसरगुंडी सुरू झाली. एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे. एनडीएने बहुमताच्या आकड्यांपेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. यावरून भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) म्हणालेत, “राहुल गांधी यांनी ज्यांच्या सोबत हात मिळवले ते बुडालेत. अखिलेश यादव यांच्यासोबत उत्तर प्रदेशात आघाडी केली. सपा पराभूत. डाव्यांसोबत पश्चिम बंगालमध्ये गेले, डावे ममता बॅनर्जींसमोर राहुल गांधींसोबत जो गेला तो बुडाला; भाजपाची टीका हारले. आणि आता तेजस्वी सोबत काँग्रेस गेली आणि तिथेही आता पराभव!”

सध्या एनडीए १२७ जागांवर आघाडीवर आहे. यात भाजपा ७३, जदयू ४७, तर व्हीआयपीचे ७ उमेदवार आहेत. महाआघाडी १०० ठिकाणी आघाडीवर आहे. यात राजद ६१, काँग्रेस २०, डावे १९ आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER