
सांगली : स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रतिभाशाली कवी होते. अस्पृश्यता निर्मुलनासाठी त्यांनी केलेले कार्य लोकोत्तर आहे. मराठी भाषाशुद्धीचे ते प्रेरणास्थान होते आणि ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झालेले ते एकमेव स्वातंत्र्यवीर होते. अशा स्वातंत्र्यसुर्याचे स्मरण या देशाला कायमच प्रेरणादायी राहील , असे मत अॅड. बाळासाहेब देशपांडे यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकरकरांच्या १३७ व्या जयंती निमित्त सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये झालेल्या आदरांजली कार्यक्रमात देशपांडे यांनी आपले विचार मांडले. आमदार गाडगीळ यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यावेळी राष्ट्रीय परिषद सदस्य प्रकाश बिरजे, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, नगरसेवक विनायक सिंहासने, नगरसेवक राजेंद्र कुंभार, विनोद पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दीपक माने, युवा मोर्चा सरचिटणीस मकरंद म्हमुलकर, अमित देसाई, योगेश जाधव, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष गौस पठाण, गणेश कांबळे, महेंद्र पाटील, अजयकुमार वाले, आबासाहेब जाधव, श्रीधर जाधव आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला