सातही समुद्र पोहून विश्वविक्रम करणारा पहिला जलतरण पट्टू ‘भारतीय’ होता !

Mihir Sen - Maharashtra Today

दृढ्य निश्चयापुढं नियतीही झुकते. अशा लोकांसाठी ‘अशक्य’ हा शब्द प्रभावहीन ठरतो. अशाच अतुट हिंमतीचं आणि निश्चयाचं उदाहरण म्हणून महिर सैन यांच्याकडे पाहिलं जातं. मिहीर सेन (Mihir Sen) यांच्यासाठी १९५८ वर्ष महत्त्वाचं ठरलं. या वर्षी त्यांनी ‘इंग्लिश खाडी’ पोहून पार केली आणि त्यांच्या नावाची जगभर चर्चा सुरु झाली. १४ तास ४५ मिनीटं पोहत त्यांनी इंग्लिश खाडी पार केली होती.असं करणारे ते पहिले भारतीय होते. यानंतर त्यांनी पाचही खंडांच्या समुद्रात पोहण्याचे वेगवेगळे विक्रम नोंदवले. असं करणारे ते पहिले भारतीय आणि आशियातील व्यक्ती बनले होते.

१६ नोव्हेंबर १९३० ला ब्रिटीश कालीन भारतात बंगालमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील डॉ. रमेश सेन गुप्ता डॉक्टर होते तर आईचं नाव लीलावती होतं. सुरुवातीचे दिवस त्यांनी दारिद्र्यात व्यतीत केले. बऱ्याच अडचणींना तोंड देत त्यांनी पदवीपर्यंतच शिक्षण पुर्ण केलं.

त्यांना इंग्लंडमध्ये वकिलीचं शिक्षण घ्यायचं होतं. जिद्दीच्या बळावर त्यांनी इच्छा पुर्ण केली. इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी एका महिला जलतरणपट्टूबद्दल वाचलं. जिनं इंग्लिश खाडी पोहून पार केली होती. त्या महिलेबद्दल वाचल्यानंतर ते इतके प्रेरित झाले की त्यांनी इंग्लिश खाडी पार करायचा निर्णय घेतला.

एक यशस्वी, प्रसिद्ध आणि सर्वश्रेष्ठ जलतरणपट्टु बनण्याचा त्यांचा प्रवास इथून सुरु झाला. त्यांनी एकाच कॅलेंडर वर्षात जगभरातल्या पाचही खंडाच्या समुद्रात पोहण्याचा विक्रम स्वतःच्या नावे करुन घेतला. सातही समुद्रात पोहण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय हा राजकीय प्रेरणेतून होता. सेन हे प्रखर राष्ट्रवादी होते. कोणत्याच क्षेत्रात भारतीय कमी नाहीत. निश्यच केला की असाध्य गोष्टीदेखील साध्य होऊ शकतात, हे त्यांना कळालं होतं. याच जोरावर त्यांना भारताचा डंका जगभर ऐकू जाईल असा वाजवायचा होता.

इंग्लिश खाडी पार केल्यानंतर ते भारतात परतले. यानंतर माध्यमांच्या मदतीने त्यांनी भारतात अनेक अभियान चालवले. भारतीय जलतरणपट्टुंसाठी त्यांनी कल्ब उभारला. भारतीय जलतरणपुट्टूंना तयार करणं त्यांना प्रशिक्षण देण्याच काम त्यांनी केलं. भारतीय जलतरणपट्टुंनी युरोप आणि अमेरिका गाजवावी ,हे त्यांच ध्येय होतं. त्यांना नेहमीच भरीव योगदान भारतासाठी द्यायचं होतं. धाडस करायला ते कधीच मागं पुढं पाहत नसत.

महिर सेन नंतर श्रीलंकेच्या तलाईमन्नार ते भारताच्या धनुष्यकोटीपर्यंत पोहले. त्यांनी हा प्रवास ६ एप्रिल १९६६ ला सुरु केला होता. २५ तास ४४ मिनीट ते सहग पोहत होते. यानंतर त्यांनी २४ ऑगस्ट १९६६ साली ८ तास १ मिनीट सलग पोहून ‘जिब्राल्ट जार ई डेनियल’ पार केलं जे स्पेन ते मोरेक्केच्यामध्ये आहे. जिब्राल्टर पोहणारे सेन हे पहिले भारतीय होते. या वर्षी त्यांनी स्वतःच्या नावावर ५ जागतिक विक्रम नोंदवले.

१२ सप्टेंबर १९६६ साली त्यांनी ‘डारडेनेल्स’ पोहून पार केला. हे करणारे ते जगातले पहिले व्यक्ती होते. यानंतर फक्त ९ दिवसांनंतर २१ सप्टेंबरला वास्फोरस पोहून पार केला. २९ ऑक्टोबर १९६६ च्या दिवशी त्यांनी ‘पनामा कॅनेल’ पोहून पार करायला सुरुवात केली. ३४ तास १५ मिनीटं पोहून त्यांनी हा विक्रमही स्वतःच्या नावे करुन घेतला. महिर यांनी एकूण ६०० किलोमीटर लांबी पोहून पार केलीये. पाचही खंडाच्या सातही समुद्रात पोहणार मिहीर सेन हे जगातले पहिले व्यक्ती होते.

भारतात जलतरण रुजवण्यासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली. ब्रिटीशांच्या गुलाम देश म्हणून भारताची ओळख त्यांनी खोडून काढायला सुरुवात केली. त्यांनी केलेल जागतिक विक्रम मोठा संदेश देतात. यानंतर त्यांनी सामाजिक कार्यात उडी घेतली.

मिहीर सेन यांचा भारत सरकारनं १९५९ साली ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मान केला. १९६७ साली त्यांना ”पद्मभूषण’ पुरस्कारानं नावजण्यात आलं. यानंतर ते ‘एक्सुप्लोरर्स कल्ब इंडीया’चे अध्यक्ष होते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावानं अनेक विक्रम नोंदवण्यात आलेत.

पुढं १९७२ साली त्यांनी एक्सुप्लोरर्स क्लबच्या माध्यमातून भारतात आलेल्या बांग्लादेशी शरणार्थींना मदत पुरवली. भारत सरकारचं कोणतंही अर्थसहाय्य नसताना ३०० बांग्लादेशी कुटुंबांना त्यांनी वसवलं. महिर सेन यांनी इतर व्यवसाय, उद्योगांमध्येही लक्ष घातलं; पण १९७२ च्या राजकीय बदलांमुळं ते अपयशी झाले.

त्यांच्या आयुष्यातला शेवटा काळ कष्टदायी होता. त्यांचा स्मृतीभ्रंश झाला होता. ११ जून १९९७ ला त्यांचा म वयाच्या ६७ व्या वर्षी मृत्यू झाला. देशासाठी इतके विक्रम करणाऱ्या या महान खेळाडूची दखल शालेय पाठ्यपुस्तकात देखील घेतली गेलेली नाही. मिहिर सेन बंगालचे महान पुत्र होते. एक असा माणूस ज्याच्यात स्वप्न पहायची हिम्मत होती. आव्हानाला सामोरं जाण्याचं ध्येय होतं. मिहीर सेन यांनी जे मिळवलं, जे शक्य केलं, ते अनेकांसाठी स्वप्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button