ते ३६ वर आउट झाले होते, आपण ४४ वर …

काँग्रेसच्या माजी नेत्याने टीम इंडियाच्या विजयातून दिला संदेश

Sanjy Jha & Team India

दिल्ली : विपरीत परिस्थितीत टीम इंडियाने मंगळवारी अभूतपूर्व कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानात पाणी पाजल. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले नेते संजय झा (Sanjay Jha) यांनी याचा दाखल देऊन ट्विटमधून काँग्रेसला भविष्यात विजयी होण्यासाठी संदेश दिला. त्यांनी ट्विट केले – यामध्ये माझ्या जुन्या पक्षासाठी एक प्रेरणादायी संदेश आहे. आम्हाला ४४ जागा मिळाल्या (लोकसभा निवडणूक २०१४ मध्ये काँग्रेसने जिंकलेल्या जागा ) उठा, …धूळ झटकून द्या… आणि लढा. भूतकाळाबद्दल ओरडणे…रडणे आता थांबवा.

संजय झा काँग्रेसचे माजी प्रवक्ता आहेत. पक्षनेतृत्वाच्या धोरणावर जाहीर टीका केल्याच्या आरोपात त्यांना पक्षातून निलंबित आले. संजय झा यांनी काँग्रेसने २०१४ लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांची तुलना टीम इंडियाने पहिल्या कसोटीत केलेल्या गचाळ कामगिरीसोबत केली. झा यांनी २०१४ मधील काँग्रेसच्या जागांचा उल्लेख केला असला तरी त्यानंतर झालेल्या २०१९ च्या निवडणुकांमध्येही काँग्रेसचा पराभव झाला आणि काँग्रेसला जागांच्या संख्येत थोडीफारच वाढ करता आली. क्रिकेट मैदानावरील भारताच्या विजयामधून प्रेरणा घ्यावी असा सल्ला झा यांनी माजी पक्षातील सहकाऱ्यांना दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER