सोनिया गांधींना सांगितले, ‘राष्ट्रवादीपेक्षा तुमचे लोक चांगले सहकार्य करतात’ – मुख्यमंत्री

Uddhav Thackeray - Sonia Gandhi

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) नुकतेच एक वर्ष पूर्ण केले. या निमित्ताने गुरुवारी मुंबईच्या सह्याद्री अतिथिगृहात ‘महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही’ या आघाडी सरकारच्या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस (Congress) अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यासोबत फोनवर झालेल्या संभाषणाचा रंजक किस्सा उपस्थितांना सांगितला. महाविकास आघाडी भक्कम असून माझी अधूनमधून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा होत राहते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांनी मला फोनवर ‘आमचे लोक सतावत तर नाहीत ना?’ असा प्रश्न विचारला.

त्यावर मी सोनियाजींना सांगितलं की, राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा चांगलं सहकार्य करतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. दरम्यान, राज्यात तीन पक्षांचं सरकार असलं तरी आमचा कारभार उत्तम चाललाय. तिन्ही पक्षांमध्ये आडमुठेपणा नाही, असं सांगतानाच राज्यावर राजकीय संकट येणार नाही, असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER