अनेक वर्षे सत्ता भोगली पण मराठा आरक्षण देता आले नाही; पंकजा मुंडेंचा सत्ताधाऱ्यांवर प्रहार

Pankaja Munde

परभणी :- यांनी राज्यात अनेक वर्षे सत्ता भोगली. पण यांना मराठा समाजाला आरक्षण देता आले नाही, असा जोरदार प्रहार भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) यांनी सत्ताधाऱ्यांवर केला. त्या व्यंकटेश मंगल कार्यालयात विधानपरिषद पदवीधर निवडणुकीसाठी भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होत्या.

पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण तसेच सरकारवर टीका केली. आमदार सतीश चव्हाण यांनी यापूर्वी कधीच पदवीधरांचा प्रश्न उपस्थित केला नाही. ते कुठेही मराठा आरक्षणाच्या लढ्यात दिसले नाहीत. अनेक वर्षे सत्तेत असताना यांना मराठा आरक्षण देता आले नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच, पुढे मराठा आरक्षणावर बोलताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न होते. असेही त्या म्हणाल्या.

यावेळी त्यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर टीकास्त्र सोडले. या सरकारवर जनता प्रचंड नाराज आहे. या सरकारमध्ये वेगवेगळ्या विचारांचे तीन पक्ष एकत्र आले आहेत. यांचे जनतेच्या हिताच्या निर्णय घेण्याचे उद्दिष्ट आहे, असे वाटत नाही, असा आरोपही त्यांनी केला.

ही बातमी पण वाचा : राज्य सरकारचा निषेध करणा-या भाजपाने कोरोनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER