आंतरराष्ट्रीय सामन्याच्या आधीच ‘हे’ खेळाडू खेळले आयपीएल

IPL Cricketers - Maharastra Today

आयपीएल २०२१ (IPL 2021) च्या सलामी सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) दक्षिण आफ्रिकन अष्टपैलू मार्को जान्सन (Marco Jansen) याला संधी दिली. यासह टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याआधी आयपीएल खेळलेल्या अगदी मोजक्या खेळाडूंमध्ये मार्कोने स्थान मिळवले आहे.

हा २० वर्षीय अष्टपैलू खेळाडू आतापर्यंत १४ प्रथम श्रेणी, १३ लिस्ट ए आणि १० टी-२० सामने खेळलेला असला तरी अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

आंतरराष्ट्रीय सामना न खेळताच आयपीएलमध्ये पदार्पण केलेल्या खेळाडूंमध्ये संदीप लामीछेन (दिल्ली), बर्ट कॉकली (पंजाब किंग्ज), मिशेल मार्श (डेक्कन), ख्रिस लीन (डेक्कन), ब्रेट जीव्हस (दिल्ली), नुवन प्रदीप (आरसीबी) आणि मार्को जान्सन यांचा समावेश आहे. याशिवाय यायादीत जोश फिलीप्स व शॉन मार्शसुद्धा येऊ शकतात. आणखीही काही खेळाडू आहेत पण त्यांची पुष्टी होऊ शकलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button