स्वतः ईडी (ED) कार्यालयात पासपोर्ट जमा केला – विजय वडेट्टीवार

Vijay Vadettiwar

मुंबई : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांच्यावर गुन्हे लपवल्याचा ठपका ठेवण्यात आल्यानंतर त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला. भाजपाचे माजी आमदार मितेश भांगडिया यांनी याबाबत तक्रार केली आहे. वडेट्टीवार म्हणालेत की, मी स्वतः ईडी कार्यालयात पासपोर्ट जमा केला. याबाबत माहिती देताना ते म्हणालेत की, आजच्या तारखेला माझ्यावर कुठलीही केस नाही.

२०१२ मध्ये शिक्षणासंबंधी चार किरकोळ केसेस होत्या. मी ईडी कार्यालयात जाऊन माझा पासपोर्ट स्वत: जमा केला. मी स्वतः व्हेरिफिकेशन करायला सांगितले. मी ओबीसीसाठी काम करतो आहे, माझ्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी येणार आहे. त्यामुळे मी पुढे जाऊ नये यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत. विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर असलेले गुन्हे लपवले, अशी तक्रार भांगडिया यांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांपासून ते पासपोर्ट ऑफिसपर्यंत केली होती. त्यावर कारवाई झाली नाही म्हणून ते हायकोर्टात गेले.

विजय वडेट्टीवार यांनी पासपोर्टसाठी मनोरा हा कायमचा पत्ता (पर्मनंट ऍड्रेस) दिला होता. तेथील पोलीस ठाण्यामधून एनओसी घेतली होती. त्यात त्यांच्यावर कुठेही केसेस सुरू नाहीत असे नमूद होते. त्यामुळे भांगडिया हायकोर्टात गेले. हायकोर्टाने पासपोर्ट ऑफिसला पाठवण्यासाठी नोटीस काढली. त्यानंतर पासपोर्ट कार्यालयाने विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त केला अशी माहिती आहे.

ही बातमी पण वाचा :बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याची चर्चा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER