कोणत्याही पदाच्या अपेक्षेने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला नाही, पण दिलेच पद तर आनंदच – एकनाथ खडसे

Eknath Khadse

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या भाषणात आपण राष्ट्रवादीकडे काहीही मागितले नसल्याचे सांगितले होते. परंतु खडसेंनी मोठ्या मनाने तेव्हा हे म्हटले असले तरी, ज्येष्ठ नेते याचा विचार करून खडसे राष्ट्रवादीत येण्याआदीपासूनच त्यांच्या पदाविषयीचा विचार राष्ट्रवादीत सुरू होता.

त्यातच आता राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत आधीपासूनच अव्वल स्थानी नाव होते. आता या चर्चेनी जोर धरला आहे. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना राज्यपालाच्या कोट्यातून आमदारकी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर बोलताना एकनाथ खडसे यांनी मी कोणत्याही पदाच्या अपेक्षेने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला नसून मी आमदारकी किंवा खासदारकी मागितली नाही. पण ती दिली तर आनंदच आहे असं खडसे म्हणाले आहेत. पद मिळालं तरी काम करणार आहे आणि नाही मिळाले तर कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाही टोला लगावला आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही किंवा कोणताही नेता भाजपाला सोडून जाणार नाही असं मत गिरीश महाजन यांनी काल जळगावी व्यक्त केले होते. यावर प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांनी कुणाच्या मागे कोण आहे आणि कोण सक्षम आहे हे आगामी काळात दिसेलच. पक्षातील कार्यकर्ते पक्ष सोडून जाऊ नये म्हणून असं विधान करावं लागतं अशी प्रतिक्रिया देत आगामी काळात राष्ट्रवादी व भाजपमधील सत्ता संघर्षाचे संकेत एकनाथ खडसे यांनी दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER