गुलाम म्हणून आला आणि मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढला!

Malik Amber - Maharastra Today
Malik Amber - Maharastra Today

एक गुलाम जो राजकीय बुद्धीमत्तेमुळं वझीराच्या पदापर्यंत होचला. त्याला भारतीय इतिहासात राजपूतांचा जिवलग मित्र आणि मुलघांचा कर्दनकाळ समजलं जातं. त्याच्या युद्धकौशल्य आणि कुशाग्र बुद्धमत्तेमुळं मुघल जेरीस आले होते. त्याचं नाव होतं ‘मलिक अंबर.’

दख्खनच्या निजामशाही दरबाराचा किंगमेकर म्हणून मलिक अंबरला ओळखलं जातं. त्यान अकबर आणि जहांगीर या दोन्ही बादशहांना मैदानात अनेकदा खडे चारले होते. मलिक अंबरनं कुशल नेतृत्त्वाच्या जोरावर राजपुत आणि पोर्तूगीज, डच, इंग्रज यांच्या तोफखान्याचं आणि नौसेनेच समर्थन त्यानं मिळवलं होतं. कधीकाळी गुलाम असलेल्या या व्यक्तीनं

लहानपण गुलामीत गेलं

मलिक अंबरचा जन्म १५४९ चा दक्षिण इथोपियातल्या हरार प्रांताचा. आफ्रिका खंडातील एका गरिब हब्शी परिवारतला त्याचं लहानपणीच नाव होतं ‘चापू.’ आर्थिक तंगीमुळं आई-वडीलांनी त्याची गुलाम म्हणून विक्री केली. तर काही इतिहासकार मानतात की अरबांनी किंवा इथोपियतातल्या सैन्यानी त्याच अपहरण करुन कैद्यांसोबत त्याल ठेवलं आणि बाजारात आणून विकलं. कारण काहीही असो पण मलिक अंबरचं अक्ख बालपण दास म्हणूनच घालवलं. त्याला यमनहून बगदादला आणण्यात आलं. बगदादचा काजी हुसैन जवळ त्याला पाठवण्यात आलं होतं. हुसैननं या गुलाम मुलाच्या क्षमता जाणल्या होत्या.

काजी हुसेन यांनी चापूला ‘अर्थ आणि प्रशासन’ विषयातलं शिक्षण दिलं. त्याच्या बुद्धिमत्तेवर खुश होऊन त्याला ‘अंबर’ हे नाव दिलं. त्याच्या हुशारीमुळंच हे शक्य झालं होतं. साऱ्या बगदादमध्ये या गुलाम हबशी मुलाला अंबर या नावानं ओळखलं जाऊ लागलं. काही दिवसांनी काजी हुसेन यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर एका गुलाम व्यापाऱ्यानं त्याला अहमदनगरच्या राजाला अंबर विकला.

गुलाम बनला वझीर

१६ व्या शतकाचा तो काळ होता जेव्हा दख्खन व्यापारसाठी समृद्ध होता. अनेक संस्कृती इथं नांदायच्या. तिथं विवधता होती. हवशी गुलामांना इमानदार दासांच्या सैन्याच्या रुपात त्या काळात पाहिलं जायचं. त्याकाळात हबशी खुप लोकप्रियही होते. अहमदनगरचा राजा चंगेज खान याच्या पदरी ही अनेक हबशी होते त्यापैकीच एक होता मलिक अंबर.

चंगेज खानकडे असतानाच मलिक अंबरनं सैन्य आणि प्रशासकिय प्रकरणात निपुणता मिळवली. त्याचं अरबी भाषेच ज्ञान आणि शासनाच्या धोरणाविषयीची कल्पक्ता अधिक मौल्यवान बनत गेली. मलिक अंबरच्या ज्ञानाचा वापर चंगेज खानानं हबशी गुलामांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी केला. मलिक अंबरच्या ज्ञानाची आणि बुद्धीमत्तेची चर्चा अहमदनगर सोबत इतर प्रांतातही पोहोचली.

मलिक अंबरचा राजकिय मुत्सद्देपणा त्याची ताकद बनला. पुढं चंगेज खानच्या मृत्यूनंतर त्याच्या विधवा पत्नीनं त्याला गुलामीतून मुक्त करत वंश वाढण्याचा सल्ला दिला. अंबरनं पुढं चालून लग्न केलं. पुढं तो अहमदनगर राज्याच्या वझीर पदापर्यंत पोहचला. वझीर झाल्यावर मलिक अंबरने अनेक चांगले निर्णय घेतले. शेतकऱ्यांना जमिनी वाटल्या. करात सुट दिली.

मराठ्यांच्या मदतीनं उभारली फौज

मुघलांनी जेव्हा अहमदनगरव हल्ला केला तेव्हा मलिम अबंरने विजापूरला जाऊन आदिलशाहीची मदत मागितली. तिथं त्यांच्यात हाती काही लागलं नाही. अहमदनगरच राज्य त्याला गमवावं लागलं. अशा प्रतिकुल परिस्थीती त्यानं निजामशाहीतल्यता एका राजकुमारा शोधून काढलं आणि ‘निजाम दुसरा’ या नावानं त्याला अहमदनगरच्या गादीवर बसवलं. तो स्वतः पेशवा बनला. त्याला पुन्हा अहमदनगरी सत्ता मजबुत बनवायची होती. आजूबाजूच्या मराठा सरदारांना त्यांन एकत्र केलं. गमिनी काव्याच प्रशिक्षण दिलं. त्याच्या सैन्यात ४० हजार मराठा आणि १० हजार हाबशी सैन्य होतं. याशिवाय पोर्तूगीज, डच, इंग्रजांकडून मुघलांविरुद्धच्या लढाईत त्याला तोफगोळ्यांच समर्थन मिळालं.

मुघलांना गुडघे टेकावे लागले.

मजबुत सैन्य, तोफगोळा आणि राजपुतांच्या अद्भूत सहासाच्या जीवावर त्यानं दख्खनेत मुघलांना भरपूर त्रास दिला. मुघल बादशाह अकबरचा भरवशाच्या सरदार आणि शक्तीशाली सेनापती अब्दूर्रहिम खान-ए-खानावर अकबरानं एक जबाबदारी सोपवली. मलिक अंबरशी त्यानं तह करावा, त्याच्याशी मैत्रीपुर्ण संबंध प्रस्थापित करावेत असं त्यांना सांगण्यात आलं. मलिक अंबरनं मोठ्या मुत्सद्दीपणानं अकबरानं दख्खनेत जिंकलेला सारा प्रदेश हस्तगत केला. मलिक अंबरनं दख्खनेत मुघलांना इतका त्रास दिला की जहांगिरानं दख्खनेत उतरुन मलिक अंबरचा बंदोबस्त करावा अशी विनंती त्याचे सहकारी बादशाह जहांगीरला करत होते.

अखेर मलिक अंबरनच्या बंडाला मोठा काळ लोटला होता. दख्खन जिंकायचं अकबर आणि जहांगीरचं स्वप्न पुर्ण होतन वह्तं. मुघलांच्या मोठ मोठ्या सरदारांना मलिक अंबरनं पळवून लावलं होतं. नंतर अचानक वेळ फिरली अंबरच्या विश्वासू सहकाऱ्यांनी त्यांची साथ सोडली मलिक अंबर कमजोर पडू लागले. त्यामुळं नाईलाजानं त्यांना मुघलांशी तह करावा लागला. मलिक अंबर यांनी जिंकलेला मोठा प्रदेश त्यांना मुघलांना परत करावा लागला. मुत्सद्दी मलिक अंबर यांच्याकडं वाट बघण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नव्हता ते थांबले आणि शेवटी योग्य वेळ चालून आलीच.

जहांगीरचा मुलगा शहांजहान यानं पित्याविरुद्ध बंड केला. मुघल आपपासात लढत असल्याच्या संधीचा फायदा उचलत पुन्हा स्वतःचा प्रदेश जिंकून घेतला. अशातच वयाच्या ८० व्या वर्षी १६२६ साली शक्तिशाली शासक मलिक अंबरचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर अहमदनगर मुघलांच्या ताब्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button