भिवंडीजवळच्या खेड्यात त्यांनी खरेदी केले ३० कोटींचे हेलिकॉप्टर

helicopter

मुंबई : महागड्या कार घेण्यासाठी श्रीमंत लोकांमध्ये स्पर्धा असते. अच्छे अच्छे श्रीमंत लोकदेखील हेलिकॉप्टर खरेदीचे स्वप्न पाहू शकत नाहीत. कारण त्यासाठी तब्बल ३० कोटी रुपये मोजावे लागतात. शिवाय, देखभालीचा खर्च असतो तो वेगळाच. मात्र, भिवंडीजवळील वडपे गावातील एका शेतकरी उद्योजकाने हा भीम पराक्रम केला आहे. जनार्दन भोईर यांनी चक्क कोणतीही महागडी कार खरेदी न करता थेट आकाशाला गवसणी घालणारे हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. आता वडप येथील त्यांच्या जागेवर कायमस्वरूपी हेलिपॅड उभारले आहे. शिवाय नियमानुसार आवश्यक असलेला सगळा स्टाफ, गॅरेज उभारले जात आहे.

भिवंडीलगत मोठ्या प्रमाणात गोदामांची उभारणी करण्यात आली आहे. ही गोदामे अत्यंत धोकादायक आहेत. अनधिकृत आहेत तशी बरेचदा चर्चा होते. एखादी दुर्घटना घडल्यानंतर तात्पुरती कारवाई होते; मात्र गोदामांच्या या व्यवसायाने परिसरातील शेकडो लोकांना मालामाल केले आहे. त्यामुळे या भागात महागड्या गाड्यांचा वावर दिसतो. मर्सिडीझ ,फॉर्च्युनर, बीएमडब्ल्यू , रेंजरोव्हर ,एमजी हेक्टर या गाड्या अनेकांकडे आहेत. कंपन्यांच्या कार मोठ्या प्रमाणावर आढळतात. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या ताफ्यात वापरली जाणारी कॅडील्याक ही कार भारतात प्रथम खरेदी करण्याचा मान भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर येथील अरुण पाटील या आगरी समाजातील उद्योजकांकडे जातो. आता वडपे या गावात राहणारे मूळचे शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणारे जनार्दन भोईर यांनी चक्क ३० कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. भोईर यांचीही काही गोदामे आहेत तसेच ते बांधकाम व्यावसायिकदेखील आहेत.

दूध व्यवसायानिमित्त त्यांना हरियाणा, राजस्थान, गुजरातमध्ये नियमित जावे लागते; याशिवाय मुंबईलाही जावे लागते. त्यामुळे त्यांना हेलिकॉप्टरची गरज भासू लागली आणि त्यांनी ते खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे नऊ आसनी नवे कोरे हेलिकॉप्टर १५ मार्च रोजी मिळणार असल्याने आज त्यांच्या जागेवर नक्की काय व्यवस्था आहे याची चाचपणी करण्यासाठी रविवारी मुंबई येथून काही तंत्रज्ञ हेलिकॉप्टर घेऊन वडपे गावात आले होते. त्या ठिकाणी अडीच एकर जागेवर संरक्षक भिंतीसह हेलिपॅड , हेलिकॉप्टर ठेवण्यासाठी गॅरेज, पायलट, इंजिनीअर, सुरक्षा रक्षक यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार असून आज गावात उतरलेल्या हेलिकॉप्टरमध्ये जनार्दन भोईर यांनी स्वतः न बसता नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्य मंडळींसह गावातील आपल्या जवळच्या मित्र मंडळींना फेरफटका मारून आणला व सर्वांनी या हेलिकॉप्टरचे जंगी स्वागत केले .

हेलिकॉप्टरने येऊन शपथ
अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील आंबीदुमाला येथील नवनिर्वाचित सरपंच जालिंदर गागरे यांनी चार दिवसांपूर्वी अनोख्या पद्धतीने सरपंचपदाची सूत्रे हाती घेतली. थेट पुणे ते आंबीदुमाला असे हेलिकॉप्टरने येऊन त्यांनी सरपंचपदाची शपथ घेतली होती.

जालिंदर गागरे हे एक उद्योजक असून पुण्यात राहतात; मात्र पुण्यात राहात असले तरी त्यांची आपल्या गावाशी नाळ जोडलेली आहे. गावाचा सर्वांगीण विकास करण्याच्या ध्येयाने त्यांनी गावची निवडणूक लढवली आणि त्यांचे संपूर्ण पॅनल बहुमताने विजयी झाले. योगायोगाने सरपंचपद सर्वसाधारण पुरुषाचे निघाल्याने जालिंदर गागरे सर्वानुमते सरपंचपदी विराजमान झाले आहेत.

झळकविण्याचा ध्यास घेऊन वाटचाल करण्यापूर्वीच सरपंच गागरे यांनी हेलिकॉप्टरने ग्रामदैवत रोकडेश्वर, अकलापूर देवस्थान, बाळेश्वर देवस्थान व सावरगाव घुले येथील खंडोबा देवस्थानवर पुष्पवृष्टी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER