वडिलांसोबत भेळ विकायचा अन झाला कोट्यधीश

He became a billionaire to sell his father

मुंबई : झारखंडमधून आलेला पंचवीस वर्षांचा बद्रीमंडल याचा एकूणच प्रवास विस्मयकारक आणि तेवढाच धक्कादायक आहे. जुहू चौपाटीवर तो काही वर्षांपूर्वी आपल्या वडिलांसोबत भेळ विकायचा. आज तो कोट्यवधी रुपयांचा मालक आहे.केवळ चौथा वर्ग पास असलेला बद्रीमंडल सायबर गुन्ह्यांमधला डॉन मानला जातो. मुंबईतील डी. बी. मार्ग पोलिसांनी झारखंडच्या जामतारा येथून बद्रीमंडलला बेड्या ठोकल्या आहेत. त्याची कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे पोलीस तपासात आढळून आले. केवळ चौथी पास असलेल्या बद्रीमंडल सायबर क्राईमचे असलेले अगाध ज्ञान पाहून पोलिसही चक्रावून गेले आहेत. एटीएम, पेटीएम, ऑनलाइन बँकिंगद्वारे तो भल्याभल्यांना गंडा घालायचा. जामतारा जिल्ह्यातील तरुणांना यानेच सायबर क्राईमचे धडे गिरवायला शिकवले.  जुहू चौपाटीवर वडिलांसोबत भेळ विकणारा बद्रीमंडल. काही दिवसांनी आपल्या मूळगावी जामतारा येथे गेला. डिसेंबर २०१९ मध्ये ऑटो स्पेअर पार्ट विकणारे व्यवसायिक आणि ज्येष्ठ नागरिक असलेल्या नागरिकाला केवायसी अपडेट

करण्याच्या नावाखाली फसवा कॉल केला आणि टीम व्युव्हर एडवेंचर एडवोकेट वेडिंग वेडिंग ॲपच्या माध्यमातून त्याने व्यवसायिकाचा ओटीपी मिळवून त्यांचा मोबाईल ॲक्सेस आपल्या मोबाईलवर घेऊन  गंडा घातला. ताबडतोब आलेले पैसे बद्रीमंडलने राजस्थानच्या अरविंद पुरोहितला पाठवले आणि अरविंदने मुंबईत सुतार काम करणाऱ्या पुखराजला ते पैसे वळते केले. पुखराजने घाटकोपर येथील एका मॉलमध्ये जाऊन पाच मोबाईल खरेदी केले.

राजस्थानहून आलेले संपत सुतार, करसी सुतार आणि पुखराज सुतार यांना डी. बी. मार्ग पोलिसांनी जानेवारी २०२० ला जेरबंद केलं. त्यांच्याकडून ७४ मोबाईल हस्तगत करण्यात आले आणि वरळी परिसरात हे वास्तव्य करत होते. सुतार बंधू हे मोबाईल खरेदी करण्यासाठी मॉलमध्ये गेले होते. त्यामुळेच बद्रीमंडलचे बिंग फुटले. अशा कितीतरी प्रकरणांमध्ये बद्री मंडलने  लोकांना गंडविले असल्याची  माहिती आता समोर येत आहे.

बद्रीमंडल हा सायबर क्राईममध्ये कुर्ला, एमआयडीसी आणि डी. बी. मार्ग पोलिसांसाठी वॉन्टेड आरोपी होता. अखेर त्याचा ठावठिकाणा लागला. नंतर मुंबई पोलिसांचे पथक जामतारातीळ बद्रीमंडलच्या गावात धडकले आणि त्यांनी बद्रीमंडलला बेड्या ठोकून डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात घेऊन आले.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकावर जामतारा गावात बद्रीमंडलला पकडताना गावकऱ्यांनी किरकोळ दगडफेक केली, सुदैवाने पोलिसांना दुखापत झाली नाही. बद्रीमंडल याने सायबर क्राईम करून करोडोची माया जमवली. त्याच्याकडे स्पोर्ट युटिलिटी व्हेहिकल (एसयूव्ही) गाडी आणि बुलेट असून गावात आलिशान घर आहे. याआधी देखील बद्रीमंडलला कफपरेड पोलिसांनी अटक केली होती.त्यानंतर तो जामिनावर सुटून पुन्हा सायबर क्राईम करत होता. एकूण २५ गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

रांचीपासून जवळपास २५० किमी अंतरावर असलेले जामतारा म्हणजे ऑनलाइन फसवणूक, सायबर क्राईम आणि फिशिंगशी संबंधित लोकांचा अड्डा आहे. फिशिंग म्हणजे युजरनेम, पासवर्ड, क्रेडिट कार्ड डीटेल्स, बँक खात्याचे डिटेल्स यासारखी गुप्त माहिती अवैध मार्गानं मिळवणे. या मिळालेल्या माहितीचा दुरुपयोग करुन संबंधिताच्या खात्यावरुन पैसे गायब केले जातात. बद्रीमंडल हा फिशिंगचा चांगलाच जाणकार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER