एचसीजी एनसीएचआरआय बनले सोलार प्लांट स्थाापित करणारे मध्यभारतातील पहिले रुग्णालय

HCG NCHRI Ajay Mehta

नागपूर : एचसीजी एनसीएचआरआय या मध्य भारताच्या् सर्वात प्रगत व सर्वव्याहपक कर्करोग केअर केंद्र ५२५ केव्हीिए सोलार प्लांट स्थाभपित करणारे पहिले हॉस्पिटल बनून हरित व स्वच्छ पर्यावरणाचे ध्येय गाठण्याच्या दिशेने झेप घेतली आहे. हे सोलार प्लांट अंदाजे 45 हजार चौरस फूट जागेवर उभारण्यात आले असून याची प्रतिमहिना अंदाजे 62 हजार 500 युनिट्स वीज निर्मितीची क्षमता आहे. ऊर्जा मंत्री व नागपूरचे पालक मंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

…तर इंदोरीकर महाराजांसाठी खुद्द संभाजी भिडे रस्त्यावर उतरणार

पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी नवीकरणीय व नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या संसाधनांचा उपयोग करण्याचा या सोलार प्लांटचा उद्देश आहे. यातून निर्माण करण्या‍त येणारी सौरऊर्जा हॉस्पिटलच्या ६० टक्केन वीज गरजांची पूर्तता करेल. संपूर्ण विदर्भ प्रांतामधील हा अनोखा प्रकल्प आहे. कार्यक्रमाप्रसंगी बोलताना नितीन राऊत म्हंणाले, ”मला आनंद होत आहे की, एचसीजी एनसीएचआरआर नवीकरणीय व ऊर्जा कार्यक्षम पद्धतींचा अवलंब करण्यारसाठी पर्यावरणास अनुकूल उपक्रम राबवत आहेत. नागपूरचा पालकमंत्री म्हणून मी आशा करतो की, या भागातील कर्करोगाने पीडित रूग्णां ना या हॉस्पिटलचे नैपुण्यत व कार्यक्षमतेचा लाभ होईल. वीजखर्च कमी करण्यासह कार्बनचे प्रमाण कमी करण्यामध्ये सक्रियपणे सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या उपक्रमाबाबत बोलताना एचसीजी एनसीएचआरआयचे संचालक डॉ. अजय मेहता म्हणाले, ”कर्करोग केअरमध्ये स्पेशालिस्टं असल्यायमुळे आमचा नेहमीच या भागातील लोकांसाठी योग्य व अर्थपूर्ण मार्ग शोधण्या‍चा प्रयत्न राहिला आहे. दरवर्षी हजारो लोकांचे कर्करोगाचे निदान या ठिकाणी होते. काही लोकांना आवश्‍यक तो उपचार मिळतो, पण बहुतेक‍ वंचित लोकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळत नाहीत. एचसीजी एनसीएचआरआय महात्मा ज्योेतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजना यासह मुख्य.मंत्री मदत निधीच्या माध्यमातून येथे गरीब लोकांचे उपचार केले जातात.