पुरामुळे जेईई-एनईईटी परीक्षा पुढे ढकलता येईल का ? उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा – उद्या सकाळी सुनावणी

HC On JEE & NEET Exam

नागपूर : विदर्भातील पूरस्थिती लक्षात घेऊन जेईई – नीट प्रवेश परीक्षा पुढे ढकलत येतील का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र आणि राज्य सरकारला केली आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांनी न्यायालयाला लिहिलेले पत्र न्यायालयाने स्वतः जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतले आहे.

विदर्भात सध्या नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्यांशिवाय अन्यत्र काही ठिकाणी पुराची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. जेईई आणि नीट या दोन्ही परीक्षा उद्या मंगळवारी होणार आहेत. नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्यांमधून १७ हजारपेक्षा जास्त विध्यार्थी या परीक्षा देणार आहेत. पुरस्थितीमुळे या जिल्यातील अनेक विध्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहचणे अशक्य आहे. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्यांमधील अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.

कोरोनाच्या स्थितीशिवाय गेल्या काही दिवसांपासून पूरग्रस्त भागात अनेक ठिकाणी पाणी घुसणे, वीजपुरवठा खंडित होणे, पुरामुळे विस्थापन अशा कारणांमुळे विषयार्थ्यांना परीक्षांची तयारीही करता आलेली नाही.

ही स्थिती लक्षात घेऊन न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि पुष्पा गणेडीवाला यांच्या खंडपीठाने याबाबतचे विद्यार्थ्यांचे पत्र जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतले. यावर उद्यापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारला उत्तर मागितले आहे. उद्या परीक्षा सुरु होण्याच्या काही तास आधी सकाळी ८. ३० वाजता यावर सुनावणी होणार आहे.

परीक्षेच्या काही तास आधी मुंबई उच्च न्यायालयाने परीक्षांबाबत अशी स्वतः दखल घेण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER