मुंबई पालिकेला कोर्टाचा दणका ; कंगनाच्या ऑफिसवरील कारवाई अवैध

Mumbai HC & BMC

मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौतच्या (kangana ranaut) कार्यालयावर मुंबई महापालिकने (BMC) अनधिकृत असल्याचा ठपका ठेवून कारवाई केली होती. मात्र, मुंबई हाय कोर्टाने (Mumbai High Court) मुंबई पालिकेची कारवाई अवैध असल्याचे  म्हणत पालिकेला जोरदार दणका दिला आहे.

कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणाची कंगनाने मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. आज कोर्टाने या याचिकेवर  निकाल दिला आहे. कंगना रनौतच्या बंगल्यावर केलेली महापालिकेची कारवाई मुंबई हाय कोर्टाने अवैध ठरवली आहे. ‘महापालिकेने कंगनाला दिलेली नोटीस अवैध आहे. त्यामुळे त्याविषयी महापालिकेला भरपाई करावी लागेल. कंगनाच्या विनंतीचा विचार करण्यासाठी नुकसानीचे मूल्यमापन नंतर केले जाईल आणि त्याविषयी नंतर निर्णय दिला जाईल.’ असा निर्णय न्या. शाहरुख काथावाला व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने दिला आहे.

तसंच, कंगनाच्या कार्यालयाविरोधात केलेली कारवाई मुद्दाम ठरवून केली आहे, चुकीच्या हेतूने केलेली आहे, असे  मतही न्यायाधीशांनी नोंदवले आहे. मुंबई मनपाची कारवाई नागरिकांच्या हक्कांविरोधात आहे, असं मतही न्यायाधीशांनी नोंदवलं आहे. त्यामुळे कंगनाचे जे नुकसान झाले त्याची भरपाई  महापालिकेला द्यावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER