वकिलांना मुंबईच्या लोकलमधून प्रवासाची परवानगी

उच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला मागितले उत्तर

Bombay High Court

मुंबई : कोरोनाच्या साथीच्या काळात वकिलांना मुंबईच्या लोकलमधून प्रवास करू देण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकारने उत्तर दाखल करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

न्यायमूर्ती अमजद सईद आणि मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने चिराग चनानी, विनय कुमार आणि सुमित खन्ना या तीन वकिलांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर व्हिडिओ कॉन्फरन्सने सुनावणी केली. वकिलांची सेवा अत्यावश्यक असल्याने, कोरोनाच्या साथीच्या काळात लोकल व विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी असलेल्यात वकिलांचा समावेश करावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

या मागणीला विरोध करताना सरकारी वकील पौर्णिमा कंठारिया आणि त्यांच्या सहायक ज्योती चव्हाण म्हणाल्या की – आजच्या परिस्थितीत राज्य सरकारसह इतर कर्मचार्‍यांनाही गाड्यांमधून प्रवास करण्याची परवानगी नाही. कोर्टाचे काम व्हिडिओ कॉन्फरन्सने सुरू आहे. कोर्टाचे कर्मचारीही स्वतःच्या व्यवस्थेने कार्यालयात येत आहेत. वकीलही स्वत:ची व्यवस्था करू शकतात. खासगी वाहनांने फिरू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER