3 वाजताच्या सुनावणीनंतर हायकोर्टाने पायलटला नवीन याचिका दाखल करण्यास सांगितले

Sachin Pilot

नवी दिल्ली : राजस्थान कॉंग्रेसमधील (Rajasthan Congress) अंतर्गत कलह आता हायकोर्टात गेला आहे. सचिन पायलट (Sachin Pilot) यांना उपमुख्यमंत्रिपदावरून व प्रदेशाध्यक्ष पदावरून कॉंग्रेसने (Congress) हटवले व त्यांच्या समर्थक बंडखोर आमदारांनाही पक्षाने नोटीस बजावली होती. त्या नोटीसी विरोधात बंडखोर नेत्यांनी आज हायकोर्टाचा (HC) दरवाजा ठोठावला.

यावर आज दुपारी 3 वाजता सुनावणी होणार होती. 3 वाजता झालेल्या सुनावणीत राजस्थान हायकोर्टाने सचिन पायलट आणि समर्थकांना नव्याने याचिका दाखल करण्यासाठी मुदत दिली. आता या प्रकरणाची सुनावणी डिव्हिजन बेंचमार्फत होणार आहे.

काय आहे नेमके प्रकरण –

गेला रविवार राजस्था कॉंग्रेससाठी सुट्टीची नाही तर बिझी आणि खळबळ उडवून देणारा दिवस ठरला. कारण कॉंग्रेसचे तरुण, तडफदार नेता सचिन पायलट यांनी पक्षाविरोदात बंड पुकारले. त्यानंतर पायलट आता भाजपात जाणार या चर्चांना उत आला होता. परंतु पायलट यांचे बंड भाजपात जाण्यासाठी नाही तर राजकीय महत्त्वाकांक्षेपायी असावे असा नंतर समज व्हावा अशी भूमिका पायलट यांनी ठेवली.

त्यानंतर कॉंग्रेसने पक्षाची महत्त्वाची बैठक बोलावली व त्या बैठकीला जे गैरहजर राहमार त्यांच्यावार पक्ष कारवाई करणार असे जाहीर केले होते. ठरल्याप्रमाणे पायलट व त्यांचे समर्थक आमदार बैठकीला गैरहजर असल्याचे सुत्रांनी सांगितले होते. त्यानंतर राजस्थान कॉंग्रेसने गैरहजर सर्व बंडखोर आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
ही नोटीस मागे गेण्याची विनंती त्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली होती.

त्या नोटीसीच्या विरोधात हे आमदार हाटकोर्टात दाद मागण्यासाठी गेले आहेत. त्यावर आज 3 वाजता सुनावणी होणार होती.

त्या सुनावणीत हायकोर्टाने पुन्हा पायलट आणि समर्थक आमदारांना फ्रेश नवीन याचिका दाखल करण्यास सांगितले आहे.

सचिन पायलट आणि अन्य 18 कॉंग्रेसचे आमदार, ज्यांनी विधानसभा अध्यक्षांकडून अपात्रतेच्या नोटीसबद्दल राजस्थान उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, ते राजस्थान विधानसभेच्या सभापतींनी 14 जुलै रोजी दिलेली कारणे दाखवा नोटीस मागे घेण्याची मागणी केली.

सुनावणी दरम्यान याचिकेत त्रुटी आढळल्यानंतर याचिकाकर्त्याकडून याचिकेत सुधारणा करण्यासाठी वेळ मागितला आहे. कोर्टाने त्यांना वेळ दिला आहे. ते सुधारित याचिका दाखल करतील तेव्हा पुढील सुनावणी होईल. अभय कुमार भंडारी, वकील महेश जोशी, कॉंग्रेस चीफ व्हिप हे वकील यावेळी उपस्थित होते.

पायलट कॅम्पने राजस्थान विधानसभेतील असंतुष्ट आमदारांना अपात्र ठरविण्याच्या आव्हानात्मक कारवाईतील याचिकेमध्ये सुधारणा करण्यासाठी वेळ मागितला आहे.

19 आमदार अद्याप कॉंग्रेस पक्षाकडे आहेत आणि त्यापैकी एकानेही आपले सदस्यत्व सोडले नाही, असा दावा याचिकेत केला आहे.

घटनेच्या दहाव्या अनुसूचीमध्ये नमूद केलेला डिटक्शन-डिफेक्शन कायद्याला याचिकाकर्ता आव्हान देणार असल्याचे साळवे यांचे म्हणणे आहे.

वकील हरीश साळवे म्हणाले की, असंतुष्ट आमदारांना राजस्थान सभापतींनी जारी केलेल्या अपात्रतेच्या नोटिसांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान द्यायचे आहे.

राजस्थान सभापतींच्या अपात्रतेच्या नोटीसला आव्हान देत 19 आमदारांनी रिट याचिका दाखल केली आहे. सचिन पायलट हा याचिकाकर्ता 7 क्रमांकावर आहे, अशी माहिती बार अँड बेंचने दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER