असा धावफलक पाहिलाय कधी? सहा त्रिफळाबाद आणि चार धावबाद!

Cricket

राष्ट्रीय स्तरावरील वन डे क्रिकेटच्या विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धेच्या सामन्यात आसामने शनिवारी सिक्किमवर (Assam Vs Sikkim). चार गडी राखून विजय मिळवला. सिक्कीमच्या 245 धावा सहज ओलांडताना आसामने 6 बाद 249 धावा केल्या. एरवी हा सामना नेहमीसारखाच साधारण वाटत असला तरी या सामन्याच्या धावफलकाने हा सामना आगळावेगळा ठरवला आहे.

सिक्कीमच्या फलंदाजांपैकी तब्बल 6 जण त्रिफळाबाद झाले आणि चार धावबाद.त्यातही विशेष असे की त्यांच्या ओळीने 5 ते 9 क्रमांकाच्या पाच फलंदाजांना प्रीतम दास (Pritam Das). याने एकाच पध्दतीने म्हणजे त्रिफळाबाद केले. या असल्या नोंदीमुळे हा साधारण सामना विशेष ठरला आहे .

सिक्किमचा हा गमतीशीर धावफलक बघा…

 • आशिश थापा त्रि. गो. गोगोई – 11
 • नीलेश लामिचानी धावबाद (डी.पी.दास) – 36
 • ली योंग लेपचा धावबाद (अहमद)- 1
 • राॕबिन बिश्त धावबाद (पी.पी.दास) – 120
 • वरुण सूद त्रि. गो. प्रीतम दास – 50
 • अनुरीत सिंग त्रि. गो. प्रीतम दास – 0
 • पाल्लोर तमंग त्रि. गो. प्रीतम दास – 2
 • मन्दूप भुतिया त्रि. गो. प्रीतम दास – 6
 • अन्वेश शर्मा त्रि. गो. प्रीतम दास – 0
 • दिनेश धोबी नाबाद – 2
 • मोहम्मद सपतुल्ला धावबाद (अहमद)- 1
 • अवांतर – 16
 • एकूण- 50 षटकात सर्वबाद 245

यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आसामच्या संघात दास आडनावाचे तीन खेळाडू खेळले. डीपी दास, पीपी दास आणि प्रीतम (पी.एल. दास) आणि या तिघांनीही धावफलकात स्थान मिळवले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER