
क्रिकेटच्या मैदानावर आजपर्यंत अनेक चित्रविचित्र गोष्टी बघायला मिळाल्या आहेत. नग्नावस्थेत खेळपट्टीवर धाव घेणारे अतिउत्साही प्रेक्षक (स्ट्रीकर्स), मधमाशांचा हल्ला, कुत्र्याची सैर, मैदानात वाहन, प्रखर सूर्यप्रकाश अशी बरीच कारणे घडली आहेत पण क्रिकेटच्या मैदानावर आजवर बघायला मिळाले नाही असे दृश्य सोमवारी अबुधाबी टी-10 स्पर्धेत बघायला मिळाले. ते सोशल मीडियावर व्हायरल झाले असून बघणारांची हसुन हसून पुरेवाट झाली.
टीम अबुधाबी (Team Abudhabi) व नाॕदर्न वाॕरीयर्सदरम्यानच्या सामन्यात हा प्रसंग घडला. या सामन्यात एकदा चेंडू वेगाने सीमेकडे चालला होता पण त्याला क्षेत्ररक्षक रोहन मुस्तफा (Rohan Mustafa) अडवू शकत नव्हता कारण त्याचा नाईलाज होता. तो यासाठी की त्यावेळी हा गडी शर्ट (जर्सी) चढवत होता आणि जर्सी घालता घालता चेंडू अडवणे त्याला केवळ अशक्य होते.
नावाजलेली महिला क्रिकेटपटू लिसा स्थळेकर हिने या गमतीशीर प्रसंगावर व्टिट करताना म्हटलेय की, क्रिकेटच्या मैदानावर आजवर बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत पण क्षेत्ररक्षण करताना चेंडू अडवणे सोडून शर्ट घालणारा क्षेत्ररक्षक पहिल्यांदाच बघितला.
या गमतीशीर प्रसंगाचा हा बघा व्हिडिओ…
Team Abu Dhabi versus Northern Warriors earlier today in the T10 League – the ball goes for 4 as the fielder Rohan Mustafa was too busy changing his jersey #T10League #Cricket pic.twitter.com/GvHZMhl2eq
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) February 1, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला