दीडशे वर्षांनंतर भरला ‘रायगडा’वरील हत्ती तलाव !

हत्ती तलाव रायगड

रायगड :- रायगड किल्ल्याचे जतन व संवर्धनाचे काम सुरू असून तेथील ऐतिहासिक हत्ती तलाव १५० वर्षांत प्रथमच पूर्ण क्षमतेने भरला आहे. अशा दुर्मिळ घटनेमुळे रायगडावरील संवर्धन कामाचे महत्त्व अधोरेखित होऊ लागले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडावर खासदार संभाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामे सुरू आहेत. त्यांच्या प्रयत्नातून ‘रायगड विकास प्राधिकरण’ स्थापन करण्यात आले. त्यांच्या माध्यमातून रायगड किल्ल्याचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. किल्ल्यावरील इतर कामांबरोबरच हत्ती तलावाचे काम करण्यात येत होते. त्याची गळती काढण्याचे आव्हानात्मक काम होते. त्याचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून त्यामुळेच तलाव भरला असण्याची शक्यता आहे.

याबाबत बोलताना खासदार संभाजीराजे म्हणाले, जीवनात असे क्षण खूप कमी येतात, ज्याचं समाधान आयुष्यभर लाभतं. रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून जे काही काम हाती घेतले आहे, त्याला यश येत आहे. हत्ती तलावाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून तलावाला अजूनही एका जागेत गळती आहे. त्या गळतीचा व्यवस्थित अभ्यास करून तीसुद्धा काढून घेतली जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER