हाथरस पीडितेचे फोटो वापरले; स्वरा भास्कर, दिग्विजय सिंह आणि मालवीय यांना नोटीस

Amit Malviya & Swara Bhaskar & Digvijay Singh

दिल्ली : हाथरस येथे घडलेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणातील पीडितेचे फोटो आंदोलनांमध्ये वापरल्याची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतः दखल घेतली. या प्रकरणी आयोगाने अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar), काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) आणि भाजपाच्या (BJP) आयटीसेलचे प्रमुख अमित मालवीय (Amit Malviya) यांना नोटिसा पाठवल्या आहेत.

आयोगानं पाठवलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, सोशल मीडियातील पोस्टमध्ये आणि आंदोलनांदरम्यान हाथरस येथील बलात्कारपीडितेचे फोटो वापरण्यात आले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशनुसार, बलात्कारपीडित महिलेची कोणत्याही प्रकारे माध्यमांतून ओळख उघड होऊ नये. हाथरस येथील पीडितेबाबत या आदेशाचे उल्लंघन झाले आहे. त्यांना आपल्या सोशल मीडिया आकाउंटवरून पीडितेचे फोटो हटवण्यास सांगितले असून नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्पष्टीकरण मागितले आहे.

१४ सप्टेंबर रोजी हाथरस येथे एका १९ वर्षीय दलित तरुणीवर गावातील कथित सवर्ण समाजातील चार तरुणांनी बलात्कार केला. तिची जीभ कापली. जीव घेण्यासाठी मानेतील मणका मोडला. अमानुष मारहाण केली. पीडित मुलीला दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. तिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER