हाथरस : मायावती करत आहेत राजकारण – रामदास आठवले

Ramdas Athawale - Mayawati

दिल्ली : उत्तरप्रदेशमधील (Uttar Pradesh) हाथरस (Hathras) येथे एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला व त्या पीडितेचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर टीका करताना बसपाच्या नेत्या मायावती (Mayawati) यांनी योगी यांचा राजीनामा मागितला. याबद्दल मायावती यांच्यावर टीका करताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आरोप केला, मायावती हाथरसप्रकरणाचे राजकारण करत आहेत.

आठवले म्हणाले – हाथरसमधील घटना मानवतेवर कलंक आहे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि पीडितेच्या कुटुंबास न्याय दिला पाहिजे. या मुद्यावरून मायावती राजकारण खेळत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा मागण्याचा त्यांना काही अधिकार नाही.

माझा १०० टक्के विश्वास आहे की, सध्याचे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री सरकार चालवण्यासाठी सक्षम नाहीत. केंद्र सरकारने नेतृत्व परिवर्तन करावे किंवा राष्ट्रपती शासन लागू करावे, अशी मागणी करून मायावती यांनी योगी यांच्यावर टीका केली – योगीजी तुम्हीदेखील महिलेच्या पोटी जन्म घेतला आहे. महिलांचे संरक्षण करू शकत नसाल तर पदावरूवन स्वतःच दूर व्हा, तुम्ही स्वतःच राजीनामा द्यायला हवा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER