हाथसर घटना: पीडित कुटुंबाला धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल ; मनसे आक्रमक

Hathras case-MNS

मुंबई: हाथसर (Hathras case) येथील सामुहीक बलात्कार व हत्येच्या घटनेने संपुर्ण देश पुन्हा हादरला आहे. देशभरातून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांनीही या घटनेचा निषेध नोंदवला असून उत्तर प्रदेश सरकारला (UP Govt) काही प्रश्नदेखील विचारले आहेत.

त्यातच आता उत्तरप्रदेश येथे घडलेल्या भयानक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबावर स्थानिक प्रशासनाकडून दबाव आणल्याचा आणि धमकावल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पीडित कुटुंबाला धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवी मुंबईत मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी ‘यूपी सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय’ अशा घोषणा देत निषेध नोंदवला. तसेच पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी केली आहे.याच्या निषेधार्थ मनसेने नवी मुंबईतील वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात उत्तरप्रदेश सरकार आणि योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात जोरदार घोषणबाजी केली.

आपचे नेते खासदार संजय सिंह यांनी देखील हा व्हिडीओ शेअर करत उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.

काय आहे या व्हिडिओत –

हाथरसचे डीएम पीडितेच्या कुटुंबीयांना धमकावत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यासंबंधीचा एक व्हिडियोही व्हायरल होतोय. यात डीएम पीडित कुटुंबाला म्हणत आहेत, “तुम्ही तुमची विश्वासार्हता संपवू नका. हे मीडियावाले आज अर्धे निघून गेले आहेत उद्या बाकीचे निघून जातील. त्यानंतर आम्हीच तुमच्या सोबत राहणार आहोत. त्यामुळे तुमची इच्छा आहे तुम्हाला वारंवार तुमचा जबाब बदलायचा आहे की नाही? तेव्हा वारंवार वक्तव्य बदलायची का ते तुम्ही ठरवा. आम्ही पण बदलू शकतो. असं डीएम म्हणताना स्पष्ट दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER