… हाच आदर आपल्याला देह आणि रक्त असणाऱ्या स्त्रियांबद्दल कधी बघायला मिळणार : जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad on Hathras Rape Case

मुंबई : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हाथरसमध्ये घडलेल्या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळी आहे . हाथरसमध्ये झालेल्या या सामूहिक अत्याचाराच्या घटनेवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे .

आपल्या ट्विटमध्ये आव्हाड म्हणाले की , आपण अशा देशात राहतो, जिथे देवींच्या मूर्तींची पूजा केली जाते आणि त्यांचा आदर केला जातो. हाच आदर आपल्याला देह आणि रक्त असणाऱ्या स्त्रियांबद्दल कधी बघायला मिळणार आहे, असे म्हणत आव्हाड यांनी हाथरसमधील घटनेवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER