आमच्यावर दबाव, योगी सरकारवर विश्वास नाही; हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांचा आरोप

hathras-gang-rape-victims-family-alleges-yogi-government

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या हाथरस इथल्या सामूहिक बलात्कार (Hathras gang rape) आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. अशात या प्रकरणात कुटुंबियांनी धक्कादायक आरोप केले आहेत. योगी सरकारने माध्यमांना परवानगी दिल्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी योगी सरकारवर (Yogi adityanath) गंभीर आरोप केले आहे.

आमच्यावर दबाव आणला जात आहे. माझ्या बहिणीवर दोनवेळा अत्याचार करण्यात आले आहेत. दुसऱ्यांना पोलिसांनी पेट्रोल टाकून जाळले. माझ्या बहिणी असा काय गुन्हा केला होता? तिला रात्रीच पेट्रोल टाकून जाळले. आम्ही हात जोडले, पाया पडलो. त्यांच्यापुढे लोटांगण घातले. मात्र, पोलिसांनी काही ऐकले नाही, आमच्या बहिणीवर त्यांनी दुसऱ्यांदा अत्याचार केला.तसेच आम्हाला कुणाशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न करु नये, अशी तंबी देखील दिल्याचा आरोप पीडित मुलीच्या भावाने केला आहे. त्याचप्रमाणे गावातल्या काही जणांची भीती वाटत आहे. गावातील लोक आम्हाला मारुन टाकतील, असा खळबळजनक आरोपही पीडित कुटुंबाने केला आहे.

आम्ही कोणत्याही राजकीय दवाबाला बळी पडणार नाही. काँग्रेसकडून आम्हाला ५० लाख रुपयांची ऑफरही देण्यात आलेली नाही. माझ्या नातेवाईकांशी बोलणे झाले आहे. त्यांनी आम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचा तो व्हिडिओ आहे. आम्हाला कोणीही कसलेली पैशाचे आमिष दाखविलेले नाही. आम्हाला न्याय मिळत नाही. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, असे पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले.

पीडितेची बहिण म्हणाली की, आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही, आम्हाला यूपी पोलिसांवर विश्वास नाही. पोलिसांनी परिवाराला मारहाण केली. आईनं देखील सरकारवर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. डीएम मदत देण्याचं बोलत होते. मात्र आम्हाला मदत नको. मदतीनं आमची मुलगी परत येणार नाही.

ही बातमी पण वाचा : मला कोणीच अडवू शकत नाही ; राहुल गांधींचा पीडितेच्या कुटंबाला भेटण्याचा निर्धार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER