हाथरस प्रकरण : योगी सरकारच्या विरोधात आज शिवसेना रस्त्यावर उतरणार

Hathras case-Shiv Sena

मुंबई : उत्तर प्रदेशातील (UP News) हाथरस (Hathras case) येथील १९ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. या घटनेनंतर शिवसेना (Shivsena) कमालीची आक्रमक झाली आहे. काळिमा फासणाऱ्या या घटनेच्या आणि उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात आज शिवसेना मुंबईच्या रस्त्यावर उतरणार आहे.

आज दुपारी चर्चगेट रेल्वेस्थानकाजवळ शिवसेनेचे नेते रस्त्यावर उतरणार आहेत. यावेळी ते घटनेचा निषेध व्यक्त करत योगी आदित्यनाथ सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या मुंबई कार्यालयातून स्थानिक नेत्यांना आंदोलनात सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER