हाथरस प्रकरण : बलात्काऱ्यांना फासावर लटकवा – इम्तियाज जलील

Imtiaz Jalil

औरंगाबाद : उत्तरप्रदेशातील हाथरस येथील दुर्दैवी घटनेनंतर पीडितेला औरंगाबाद शहरात एमआयएमच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. औरंगाबाद चौकात एमआयएमच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत कँडल मार्च काढून श्रद्धांजली वाहिली. यावेळी एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी भाजप (BJP) आणि योगी सरकारवर (Yogi Adityanath) सडकून टीका केली.

सुप्रीम कोर्ट, सीबीआय, लोकसभा आणि पार्लमेंटवर आमचा विश्वास आहे. परंतु याच संस्था धोका देत असतील तर काळजी करण्याची वेळ आली आहे. पीडितेच्या घरच्यांना भेटू नाही दिले म्हणजे हा गुंडाराज आहे. हाथरस घटनेतील बलात्काऱ्यांना औरंगाबादमधील क्रांती चौकात फासावर लटकावले पाहिजे. देशात जे सुरू आहे ही येणाऱ्या काळाची झलक आहे. भारतीय जनता पक्षाचे लोक रस्त्यावर का उतरत नाहीत. त्यांच्या घरी मुली, आई, बहिणी नाहीत का?, असा सवाल जलील यांनी यावेळी उपस्थित केला.

सध्या देशात गुंडाराज पसरला जात आहे. राहुल गांधींच्या कॉलरपर्यंत हात पोचले आहे. म्हणजे पोलिसांची दंडुकेशाही सुरू झाली आहे. सर्व सिस्टम हे रिमोट कंट्रोलवर सुरू आहे. योगी आदित्यनाथला सत्तेतून बाहेर काढले पाहिजे,असेही जलील यावेळी म्हणाले.

ही बातमी पण वाचा : उत्तर प्रदेशातील घटनेनंतर वाचाळवीरांची वाचा कुठे गेली – सामना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER