हाथरस अत्याचार प्रकरण : पोलीस अधीक्षकांसह ७ अधिकारी निलंबित

5c00soa_yogi-adityanath-up-budget-2019_625x300_07_February_19

लखनौ : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने पोलीस अधीक्षक, उप अधीक्षक, पोलीस निरीक्षकासह ७ जणांना निंबीत केले आहे. या प्रकरणात पोलीस अधीक्षक आणि उप अधीक्षक या दोघांचीही नार्को आणि पॉलिग्राफ चाचणी केली जाणार आहे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, या प्रकरणी आज दिववसभर देशात अनेक ठिकाणी उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात निदर्शने झाली. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली.

प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारे आदित्यनाथ यांनी पोलीस अधीक्षक विक्रांत वीर, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांवर काहींवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पीडित कुटुंबाला धमवल्याचा आरोप असलेले जिल्हाधिकारी प्रवीणकुमार लक्षकार यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. योगी यांनी आज ट्विट करून म्हटले होते की – या प्रकरणातील गुन्हेगारांना अशी शिक्षा करू की उदाहरण ठरेल, हा आमचा संकल्प आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER