द्वेष व तिरस्काराने आता क्रिकेटही सोडले नाही; राहुल गांधींची टीका

Rahul Gandhi -Wasim Jaffer

द्वेषाची प्रवृत्ती क्रिकेटचे (Hate marred cricket)नुकसान करत आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वसिम जाफर(Wasim Jaffer) आणि उत्तराखंड (Uttarakhand) क्रिकेटमध्ये गाजत असलेल्या जातियवादाच्या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. हा देश सर्वांचा आहे. त्याच्या एकतेला धक्का पोहचू देऊ नका असे त्यांनी आपल्या व्टिटमध्ये म्हटले आहे.

गेल्या काही वर्षात द्वेष व तिरस्कार या गोष्टी भारतात सामान्य झाल्या असल्याचीही टीका त्यांनी केली आहे. द्वेष आणि तिरस्कार एवढा पसरलाय की त्याने आपल्या सर्वांचा आवडता क्रिकेटचा खेळसुध्दा सोडलेला नाही. कोणाचेही नाव न घेता राहुल गांधी यांनी ही टीका करतानाचा आपली एकता नष्ट करण्याचे प्रयत्न सफल होऊ देऊ नका, असे आवाहनसुध्दा केले आहे.

भारताचे माजी कसोटीपटू व रणजी स्पर्धेतील सर्वात यशस्वी फलंदाज वसीम जाफर यांनी अलीकडेच कामकाजात हस्तक्षेप व वशिलेबाजीचा आरोप करत उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदाचा राजिनामा दिला आहे तर वसिम जाफर यांनी संघात जातियवादी वातावरण तयार केले आणि मुस्लीम खेळाडूंना प्राधान्य देत पक्षपात केल्याचा आरोप उत्तराखंड क्रिकेट संघटनेचे सचिव महिम वर्मा व संघव्यवस्थापक नवनीत मिश्रा यांनी केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER