भाजपच्या लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास प्रस्तावाची घाई

BJP Logo

कोल्हापूर :- लोकनियुक्त सरपंचांवर सदस्यांना अविश्‍वास ठराव आणता येत नव्हता. यासाठी ग्रामसभा घ्यावी लागत होती. एखाद्या सरपंचाने कितीही मनमानी कारभार केला, तरीही त्याविरुद्ध सदस्यांना अविश्‍वास ठराव करता येत नव्हता. दरम्यान, आघाडी सरकारने सरपंचांवर अविश्‍वास दाखविण्यासाठी ग्रामसभेची गरज नसल्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे, सदस्यांनी आता अशा सरपंचांवर अविश्‍वास ठराव आणण्यास सुरवात केली आहे.

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील ऑक्‍टोबर 2017 मध्ये ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. अशा 450 ग्रामपंचायतींची निवडणूक झाली आहे. यात त्यावेळच्या सरकारने दिलेल्या निर्णयानुसार सरपंचांची थेट ग्रामस्थांनी नियुक्ती केली होती. त्यांची मुदत अद्याप संपायची आहे. लोकनियुक्तांवर अविश्‍वास आणण्यासाठी विरोधी गटांची धावपळ सुरु झाली आहे. जिल्ह्यात लोकनियुक्त सरपंचांची आपले पद वाचविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. यामध्ये एका गटाचे सदस्य जास्त असताना दुसऱ्या गटाचा सरपंच किंवा भाजप पुरस्कृत सरपंच असणाऱ्या ग्रामपंचायतीतील सदस्य अधिक आक्रमकतेने हा ठराव दाखल करीत असल्याचे चित्र आहे. राज्यात भाजप (BJP) सरकारच्या सत्ताकाळात ग्रामपंचायतींच्या सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे, यासाठी लोकनियुक्त सरपंच संकल्पना पुढे आली. भाजप सरकारने राज्यातील ग्रामपंचायतींसाठी सदस्यांप्रमाणे सरपंचही लोकनियुक्त केले. यात बहुतांश ग्रामपंचायतींतील सदस्य कॉंग्रेस (Congress), राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि शिवसेनेचे (Shiv Sena) आहेत. पण, सरपंच मात्र भाजपचे निवडून आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात विविध आघाड्यांची निवडणूक लढवली जाते. एका गटाचे सदस्य जास्त असतानाही सरपंच मात्र विरोधी गटाचा झाला आहे. अशा गावाने विश्‍वास दाखविलेल्या सरपंचांवर सदऱ्यांकडून अविश्‍वास ठराव आणला जात आहे.

ही बातमी पण वाचा : सांगली : जयंत पाटीलांच्या फोडाफोडी राजकारण, काँग्रेस नाराज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER