लॉकडाऊन लागणारच, व्यावहारिक भूमिका घ्या; हसन मुश्रीफ यांचे व्यापाऱ्यांना आवाहन

Hassan Mushrif

कोल्हापूर : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांची आज व्यापारी आणि औद्योगिक वसाहतीमधल्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली. यावेळी हसन मुश्रीफ यांनी २ दिवसांनी लॉकडाऊन (Lockdown) लागणारच आहे. आपण व्यावहारिक भूमिका घेऊ, असे आवाहन व्यापाऱ्यांना केले.

हसन मुश्रीफ म्हणाले की, “दुकाने सुरू करण्याच्या परवानगीबाबतची भावना वरिष्ठ पातळीवर पोहोचवल्या आहेत. दोन दिवसांनी लॉकडाऊन लागणारच आहे. आपण व्यावहारिक भूमिका घेऊ. आम्ही राजकारण करणार नाही पण लस, रेमडिसिवीर कमी पडणार नाही, याची काळजी मोदी साहेबांनी घेतली पाहिजे. मुख्यमंत्री गेले तीन-चार दिवस वेगळ्या घटकांशी चर्चा करत आहेत. पॅकेजबाबत योग्य तो निर्णय घेतील. इतके जीव गेल्यानंतर का होईना केंद्राने रेमडिसिवीरची निर्यात थांबवली. याबद्दल केंद्राचे आभार मानले पाहिजे. प्रवीण दरेकर म्हणतात, आम्ही केंद्रावर बोलतो, औषध लस याची कमतरता असताना आणखी काय केले पाहिजे.”

बाळासाहेब थोरातांची भूमिका

“कोरोनाबाधित रुग्णांचे आकडे सातत्याने वाढत चालले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री, विरोधक आणि तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. याबाबत लवकरच निर्णय झाला पाहिजे.” असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. या लॉकडाऊन काळात कामगारांना काय मदत द्यायची, याबाबत अर्थमंत्र्यांबरोबर चर्चा केली जाईल. हातावर पोट असणाऱ्यांचे काही करावे लागेल. लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, असे मला वाटते. लॉकडाऊन न केल्यास संसर्ग वाढत जाईल.” असे बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button