फडणवीसांच्या मिठाला जागणाऱ्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या – हसन मुश्रीफ

Devendra Fadnavis & Hassan Mushrif

मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) मिठाला जागणाऱ्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, अशी खरमरीत टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी केली आहे. बुधवारला ठाकरे सरकारकडून पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील ४० हून अधिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश राज्य सरकारने जारी केले.

मात्र कोरोना काळात अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरू असल्याने सरकारवर टीका केली जात आहे. “काही अधिकारी फडणवीस सरकार काळातील ते खाल्ल्या मिठास जागत होते. यामुळेच त्यांना बदललं.” अशी टीका मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांचं नाव न घेता केली. तसेच राज्यातील धार्मिक स्थळे उघडी करण्यासाठी विरोधकांकडून आंदोलन केलं जातं आहे, यावर मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली. “धार्मिक स्थळे उघडी करावी म्हणून आंदोलन केले जात आहे.

पण कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. धार्मिक स्थळे उघडी केल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ती बंद ठेवण्यात आली आहेत. आता ई-पास काढला. लोक प्रवास करतील.

मात्र अजून कोरोनाची भीती आहे. काही दिवस लोकांनी थोडा संयम बाळगावा.” असं आवाहनही मुश्रीफ यांनी केलं. मुख्यमंत्र्यांच्या वर्क फ्रॉम होमवरून विरोधकांकडून सतत टीका केली जात आहे. या टीकेला उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्री, सह्याद्री येथून योग्य पद्धतीने काम करत आहेत. राज्यातील प्रश्न सोडवत आहेत. विरोधक विनाकारण मुख्यमंत्र्यांना बदनाम करत आहेत.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER