राष्ट्रवादीतून बाहेर पडणारी उंदरे- हसन मुश्रीफ

Hassan Mushrif

कोल्हापूर :  जहाज बुडत असताना पहिल्यांदा उंदरं बाहेर पडतात, अशा शब्दांत  पक्षांतर करणाऱ्या आमदारांना  पक्षाचे उपाध्यक्ष आ. हसन मुश्रीफ यांनी शनिवारी टोला दिला.

 

ही बातमी पण वाचा:- …तसंही भरंडं पीठ आपोआप बाजुला गेलेलं कधीही चांगलंच – रोहित पवार

दोन दिवसांपूर्वी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी साखर कारखाना व पाहुण्यांच्या घरी आयकर विभागाने छापे टाकले होते. सचिन अहीर, चित्रा वाघ यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे मोहरे भाजप व शिवसेनेच्या वाटेवर आहेत. कोल्हापुरात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.  वाय.  पाटील यांनीही राधानगरी भुदरगड तालुक्यातील उमेदवारी न मिळाल्यास कमळ हातात घेण्याचे संकेत दिले आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत राष्ट्रवादीला भगदाड पडत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे  जे नेते पक्षात येण्यास नकार देत आहेत त्यांच्या संस्थांवर  कारवाईची भीती दाखवून पक्षांतर करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार हसन मुश्रीफ यांनी जहाज बुडत असताना सर्वांत  प्रथम त्यातून उंदरं बाहेर पडतात, असे सांगत, ‘दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल’ या गीताप्रमाणे निश्चित चांगले दिवस येतील, असा आत्मविश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी या पार्श्वभूमीवर बोलून दाखवला.

ही बातमी पण वाचा : ‘होय मी पवार साहेबांसोबत’, पवारांच्या धीरासाठी कार्यकर्त्यांची सोशल मीडियावर मोहीम !