हसन मुश्रीफ यांनी केली पत्राव्दारे चंद्रकांतदादांना ही विनंती

Mushrif-Patil

कोल्हापूर :- दोन रुपयांत अर्सेनिक अल्बम 30 औषध आपण उपलब्ध करून देणार असल्यास सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना आपल्याशी संपर्क साधून हे औषध खरेदीकरण्‍याच्‍या सूचना देण्यात येतील. याकामी आपण सहकार्य करावे, अशी विनंती करणारे पत्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना गुरूवारी पाठविले. औषध निवेदेबाबत माफी मागावी अन्यथा दावा ठोकण्याच्या इशाऱ्याकडेही मुश्रीफ यांनी लक्ष वेधले आहे.

ह्या बातम्या पण वाचा

ग्राम पंचायतींना देण्यात येणाऱ्या १४व्या वित्त आयोगाच्या निधीच्या व्याज रकमेतून राज्यातील पाच कोटी जनतेला अर्सेनिक अल्बम देण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा प्रकारे गावच्या विकासाच्या निधीतून गोळ्या देणे चुकीचे असल्याचे आ.चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. या गोळ्या दोन रुपयांत मिळतात असेही म्हटले होते. यावरुन हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात कलगीतुरा रंगला होता. आता पुन्हा पाटील यांना पत्र पाठवून मुश्रीफ यांनी कमी दराने गोळ्या देण्याबाबत विचारणा केली.

१३ वा वित्त आयोग २०१०ते २०१५ या कालावधीकरिता होता. या कालावधीतील साधारणता नऊ ते दहा कोटी रुपये वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये ते अखर्चित रक्कमा म्हणून शिल्लक होत्या. तसेच १४ व्या वित्त आयोगातील २०१५ ते २०२० व्याजाची रक्कम खर्च करण्याबाबत सर्व अधिकार राज्य शासनास आहेत. १४ व्या वित्त आयोगातील अखर्चित व्याजाची रक्कम खर्च न केल्यास त्या रक्कमा केंद्र शासनाकडे वर्ग कराव्या लागतात किंवा १५ व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यानिधीतून गोळ्या खरेदीचे ठरले. औषध जिल्हा स्तरावर खरेदी करण्याच्या सूचना सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना देण्यात आल्या. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी संभ्रम निर्माण केला आहे. त्याचा खुलासा करुन माफी मागावी यापूर्वी एकदा फौजदारी केली आहे. आता दुसरा दावा करण्याची वेळ आणू नका असा इशाराही मुश्रीफ यांनी पत्रात दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER