खासगी डॉक्टरांनो, नुसत्या नोटाच छापू नका : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : खासगी डॉक्टरांनो, कोरोना उपचाराच्या नावाखाली नुसत्या नोटाच छापू नका. माणुसकीचा ओलावाही जिवंत ठेवा, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले. कोरोना बाधित (Corona Virus) रुग्णांचा केवळ गैरफायदा न घेता समाजाची सेवाही करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

समरजितसिंह घाटगे यांचे नाव न घेता मुश्रीफ म्हणाले, त्यांचा साखर कारखाना आहे. आवश्यक साधनसामग्रीही तयार आहे. त्यांनीही एखादे कोव्हिड सेंटर सुरू करावे. जनसेवेसाठी हातात हात घालून काम करूया. या संदर्भातील त्यांच्याशी चर्चेलाही मी तयार आहे.

नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन व डॉ. अमर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी मुश्रीफ बोलत होते. यावेळी नगरसेवक प्रवीण काळबर यांनी सुरू केलेल्या रुग्णवाहिकेचाही शुभारंभ झाला. कागलमधील कोरोनामुक्त हिंदुराव परसू पसारे (वय 75) व त्यांच्या पत्नी सौ. सुलोचना (वय 70) यांचा सत्कार मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. मंत्री मुश्रीफ म्हणाले, सेवाभावी पद्धतीने सुरू केलेले महाराष्ट्रातील हे पहिले व एकमेव कोव्हिड हॉस्पिटल आहे. 112 बेडच्या या हॉस्पिटलमधून अलगीकरणसह ऑक्सिजन व्हेंटिलेटर या सुविधाही आहेत. माझं कुटुंब-माझी जबाबदारी हे दोन टप्प्यांतील अभियान प्रभावीपणे राबवूया, घराघरांत ताप आणि ऑक्सिजनची तपासणी करून जे संभाव्य रुग्ण असतील त्यांची टेस्ट करून त्यांच्यावर तातडीने उपचार करूया.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER