परप्रांतीय कामगारांनी गावी जाऊ नये, सरकार तुमची काळजी घेईल : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Crises) रोखण्यासाठी १२ ते १३ दिवसांच्या लॉकडाऊनची (Lockdown) शक्यता आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले. लॉकडाऊनची घोषणा बुधवारी होऊ शकते. पण लोकांची ऐनवेळी गैरसोय होऊ नये म्हणून लॉकडाऊनची अंमलबजावणी मात्र दोन दिवसांनी होईल, अशी शक्यता वर्तवली आहे.

या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी कोल्हापुरात (Kolhapur) माध्यमांशी संवाद साधला. लॉकडाऊनच्या भीतीने गावात परतणाऱ्या परदेशी कामगारांना महाराष्ट्रातच राहण्याचे आवाहन त्यांनी केले. “राज्य सरकार तुमची सर्व काळजी घेईल. कामगारमंत्री म्हणून मी तुम्हाला आश्वासन देतो. महाराष्ट्राला तुमच्या सगळ्यांची गरज लागणार आहे. त्यामुळे परप्रांतीय कामगारांनी गावी परतण्यासाठी रेल्वेस्थानके आणि बसस्थानकांवर गर्दी करू नये.” असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

पोट भरण्यासाठी मजुरांची भटकंती
एकीकडे लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय मजूर गावी परतत आहेत. तरी नागपुरातील काही कामगारांनी महाराष्ट्रातच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात जगण्यासाठी अन्नधान्य गोळा करण्यासाठी सध्या हे मजूर भटकंती करत आहेत. या मजुरांनी मंगळवारी प्रतापनगर भागात गर्दी केली. सध्या लॉकडाऊनच्या शक्यतेने मजुरांना फार काम मिळत नाही. त्यामुळे पोट भरण्यासाठी या मजुरांना वणवण करावी लागत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button